राहुल गांधींवर टीका करताना PM मोदींनी घातलं होतं खास जॅकेट... काय आहे वैशिष्ट्य?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (8 जानेवारी) खास निळ्या रंगाचं जॅकेट परिधान करून लोकसभेत पोहोचले होते.

मोदींनी परिधान केलेलं हे जॅकेट त्यांना भेट म्हणून मिळालं आहे.  

काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीकचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. 

यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पंतप्रधान हे जॅकेट भेट म्हणून दिलं.

या जॅकेटचं वैशिष्ट्य असं आहे की, ते प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलंय. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 100 दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे लक्ष्य ठेवलंय. 

रिसायकल केलेल्या पीईटी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून हे जॅकेट बनवलं आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन हे जॅकेट्स पेट्रोल पंपावरील सहाय्यकांनाही देणार आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories