Photo Credit; instagram

Arrow

PM मोदींचा वेगळाच थाट! 10 स्वातंत्र्य दिनाचे 10 लुक

Photo Credit; instagram

Arrow

आज 15 ऑगस्ट 2023 रोजी भारत 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी त्यांच्या दमदार भाषणाने तसेच त्यांच्या पेहरावाने प्रत्येक देशवासीयांचे मन जिंकले. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पीएम मोदींनी राजस्थानची खास बांधिनी डिझाईनची पगडी घातली आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा, हिरवा यासह अनेक रंगांचा समावेश होता. 

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदींचा हा अंदाज नवा नाही. 2014 ते 2023 पर्यंत ते नेहमीच टीपटॉप तयार होऊन असतात. चला त्यांच्या लुक्सबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी तिरंगी फेटा बांधला होता. यासोबत मोदींनी पांढरा कुर्ता, चुरीदार पायजमा आणि निळ्या रंगाचा जॅकेट परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

2021 साली पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी 8व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. त्यावेळी पीएम मोदी पांढरा कुर्ता, स्काय ब्लू जॅकेट आणि भगव्या फेट्यासह दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

2020 मध्ये PM मोदींनी भगवा आणि क्रीम रंगाची पगडी घातली होती. हाफ बाही असलेल्या कुर्त्यात मोदी चांगले दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी, PM मोदींनी पांढर्‍या कुर्त्यासह स्टोल कॅरी केला होता. त्यांनी राजस्थानी शैलीची पगडी बांधली होती.

Photo Credit; instagram

Arrow

2018 च्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी लाल आणि भगव्या रंगाची पगडी बांधली होती. पांढऱ्या कुर्ता-पायजमा लुकमध्ये ते एकदम परफेक्ट दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

2017 मध्ये, जेव्हा पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून चौथ्यांदा ध्वज फडकवला तेव्हा त्यांनी बदामी रंगाच्या कुर्त्यावर लाल आणि पिवळ्या रंगाची चेक्स असलेली पगडी बांधली होती. त्यावेळीही त्यांच्या लूकचे कौतुक झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साधा कुर्ता आणि चुरीदार पायजमामध्ये दिसले. यावेळी त्यांनी लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची राजस्थानी पगडी बांधली होती.

Photo Credit; instagram

Arrow

2015 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या चेक्स असलेल्या पगडीमध्ये दिसले. यावर त्यांनी बदामी रंगाचा शर्ट आणि जॅकेट कॅरी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

2014 साली पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी त्यांनी हाफ स्लीव्ह शर्टसह लाल आणि पिवळा फेटा बांधला.

BB OTT 2 चा एल्विश यादव ठरला विजेता, किती मिळणार पैसे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा