World Cup 2023: श्रेयस अय्यरचं शतक होताच रोहितने 'असं' का केलं?
आयसीसी वन डे वर्ल्ड कप 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला होता.
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यच ठरला.
या सामन्यात भारताने शानदार फलंदाजी करत 50 षटकांमध्ये 4 बाद 397 धावांचा टप्पा गाठला होता.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (47), शुभमन गिल (80) यांनी पहिल्या 8.2 षटकात 71 धावा केल्या होत्या.
सामना खेळत असताना विराट कोहलीने 117 धाव्या केल्या होत्या,मात्र वनडे क्रिकेटच्या इतिहासात त्याने अजूनपर्यंत 50 शतके झळकावली आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे.
श्रेयस अय्यरनेही झंझावाती शतक झळकावत 105 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याच्या या शतकावर मात्र रोहित शर्माने त्याच्या स्टाईलमध्ये अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर काही जणांकडून 'कौन सा नशा किया है' असा सवाल करत त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.