Valentine Week: 'प्रपोज डे' च्या दिवशी 'हे' सेलिब्रिटी भेटले अन्...

बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमी वेगवेगळ्या चर्चेमुळे ट्रेडिंग असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर, कधी वयैक्तिक आयुष्यामुळे...

असचं काहीसं, दोन सेलिब्रिटींसोबतही घडलंय. त्यांना एकत्र स्पॉट केलं गेल्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलंय.

कार्तिक आर्यन, सारा अली खान हे लव्ह आज कल 2 चे शूटिंग करत होते तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी समोर आलेली. 

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फ्लॉप झाला आणि त्यानंतर त्यांचं नातं तुटलं अशी चर्चा होती. 

मात्र, आता ते प्रपोज डेच्या दिवशी दोघं एकत्र दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची कुजबुज सुरू झाली आहे. 

सध्या दोघंही उदयपूरमध्ये असल्याचं म्हटलं जातं आहे.

प्रपोज डेच्या दिवशी त्यांचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 

एका व्हायरल फोटोमध्ये दोघंही एकमेकांशी बोलताना आनंदी दिसत आहेत. चाहत्यांनाही त्यांना एकत्र पाहून आनंद झाला आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories