विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात संपन्न झाला.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनीही शपथ घेतली.
सत्यजीत तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर तसेच आजोबा, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करुन शपथ घेतली.
सत्यजीत तांबेंनी घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या शपथ विधीची जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव असलेले आमदार सत्यजीत तांबे हे पहिल्यांदाच विधान परिषदेवर निवडून आले आहेत.
शपथविधीपूर्वी तांबे यांनी शिर्डी येथे जावून श्री. साईबाबांचेही दर्शन घेतले.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेब स्टोरींसाठी
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!