Seema Haidar चा भारतीय दीर म्हणतोय, 'माझी वहिनी तर किलर आहे किलर...'
Photo Credit; instagram
सध्या देशात सचिन आणि पाकिस्तानी सीमा हैदरची लव्हस्टोरी चर्चेत आहे. पाकिस्तानी सुनेला भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
Photo Credit; instagram
सचिनसाठी पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमाला अनेक लोक पाठिंबा देत आहेत. ते म्हणतात, दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र राहण्याची परवानगी दिली पाहिजे.
Photo Credit; instagram
सध्या दोघेही जामिनावर सुटले आहेत. मात्र कायद्याचा निर्णय येणे बाकी आहे. या सर्वात सीमाच्या दिराने म्हणजेच सचिनच्या भावाने केलेलं विधान चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
सीमाच्या दिराने तिचे कौतुक केलंय. तो म्हणाला 'वहिनीचा तर विषयच नाही ती भारीच आहे, ती किलर आहे किलर.. मी तिचा दीर आहे त्यामुळे तिची मस्करी करू शकतो.'
Photo Credit; instagram
दुसरीकडे सीमा म्हणते, 'आजकाल तिला घरी भेटणाऱ्यांची संख्या खूप आहे. सचिन, मुलं आणि स्वतःसाठीही तिला वेळ मिळत नाही.'
Photo Credit; instagram
त्याचबरोबर भारतातील लोकांचे कौतुक करत ती म्हणाली, 'जेवढं प्रेम मला भारतात मिळतं तेवढं प्रेम मला पाकिस्तानात राहून कधीच मिळालं नाही.'
Photo Credit; instagram
'पाकिस्तानात तिचं जीवन नरक बनलं होतं. पण इथे आल्यावर सचिनसोबत एक स्वातंत्र्य वाटतंय.'
Photo Credit; instagram
यासोबतच सीमाने असेही सांगितले की, मला आता पाकिस्तानात परत जायचं नाही. जर ती परत गेली तर तिला मारून टाकतील.
Photo Credit; instagram
सीमा आणि सचिन दोघेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सीमाला परत पाकिस्तानला न पाठवण्याची विनंती करत आहेत.