शाहरुखच्या 'जवान'ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण...
किंग खानच्या 'जवान' चित्रपटाने चमत्कार केले आहेत जे इतर कोणताही भारतीय अभिनेत्याला जमले नाहीत.
'जवान'च्या कलेक्शनने 1000 कोटींचा आकडा पार केला . एका वर्षात 1000 कोटी रुपयांचे दोन चित्रपट देणारा शाहरुख हा एकमेव भारतीय अभिनेता आहे.
बॉलिवूडमधील 3 चित्रपट आहेत ज्यांची कमाई 1000 कोटींहून अधिक आहे. त्यापैकी सर्वात वेगाने कमाई 'जवान'ने केली आहे. ही कमाई करण्यासाठी फक्त 18 दिवस लागले आहेत.
शाहरुखने 1000 कोटींची कमाई करुन त्याने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. त्याच्या मागील 'पठाण' या चित्रपटानेही 1000 कोटींचा आकडा फक्त 27 दिवसात पार केला होता.
साऊथचेच चित्रपट अजूनही कोटीचा गल्ला करण्यात पुढे आहेत. यामध्ये 3 साउथचे चित्रपट आहेत. रॉकिंग स्टार यशच्या 'KGF 2' ने 16 दिवसांत 1000 कोटींची कमाई केली होती.
एसएस राजामौली यांच्या आरआरआरने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती. हा टप्पा पार करण्यासाठी ऑस्कर विजेत्या चित्रपटाला केवळ 16 दिवस लागले होते.
प्रभासची मुख्य भूमिका असलेला 'बाहुबली 2'हा 1000 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट नाही तर आतापर्यंतचा सर्वात वेगाने कमाई करणारा चित्रपट आहे.
एप्रिल 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'बाहुबली 2' ने अवघ्या 10 दिवसांत जगभरात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला होता. 5 वर्षांनंतरही त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही.
बॉलीवूडमध्ये 1000 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट हा दंगल होता. डिसेंबर 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यापूर्वी 716 कोटींची कमाई केली होती.