Starbucks: दोन कप कॉफीचे घेतले तब्बल 3 लाख 67 हजार, जोडप्याला बसला धक्का!

कॉफीची आवड एका जोडप्याला चांगलीच महागात पडली आहे. 

जेसी आणि ओडेल नावाचं जोडपं अमेरिकेतील स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यासाठी गेलं होतं. 

दोन कप कॉफी प्यायल्यानंतर त्यांनी क्रेडिट कार्डने पैसे दिले.

नंतर, घरी आल्यावर या जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण क्रेडिट कार्डमध्ये कोणतीही रक्कम  शिल्लक नव्हती. 

स्टारबक्समधील कार्डवरून 3 लाख 67 हजार रुपयांचे पेमेंट झाल्याचे समजले. 

दोन कप कॉफीचे एवढे मोठे बिल पाहून जेसी आणि ओडेलला धक्का बसला आणि त्यांनी स्टारबक्सच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला.

स्टारबक्सच्या व्यवस्थापकानुसार, कंपनीने नंतर चेकद्वारे अतिरिक्त पैसे जोडप्याला दिले. पण तो चेकही बाऊन्स झाल्याचे या जोडप्याचं म्हणणं आहे.

या प्रसंगी FOX23 ने स्टारबक्सशी संपर्क साधला. स्टारबक्सने सांगितले की, ग्राहकांची समस्या लवकरच दूर होईल. 

स्टारबक्सने याला 'ह्यूमन एरर' असं नाव दिलं आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories