अक्षता मूर्तींची साधी राहणीमान पाहून वाटणारही नाही की, या आहेत कोट्यवधींच्या मालकीन
ब्रिटनच्या राष्ट्रध्यक्ष ऋषी सुनक आपली पत्नी अक्षता मूर्तीसह भारतात झालेल्या जी 20 बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते.
अक्षता यांना बड्या उद्योजक घराण्याचा वारसा आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची ती एकुलती एक कन्या आहे.
अक्षता मूर्तींचा फॅशन सेन्स इतका जबरदस्त आहे की, त्याचा अनुभव त्यांच्या भारतभेटीवेळी आला आहे. अक्षता यांच्या साधेपणामुळेच त्यांनी अनेकांची मनं जिंकली आहेत.
अक्षता मूर्ती यांनीही दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिल इंडियालाही भेट दिली. यावेळी अक्षताने गुलाबी आणि लाल रंगाचा बहुरंगी कॉर्ड सेट परिधान केला होता.
अक्षताचा साधा आणि बहुरंगी केलेला पेहराव हा को-ऑर्डर रिया भट्टाचार्यच्या भारतीय ब्रँड ड्रॉचा होता. त्यामध्येच त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
अक्षता मूर्तींच्या बहुरंगी को-ऑर्डर सेटला 'वाइल्ड आयरिस सॅटिन मिडी स्कर्ट' असं नाव देण्यात आले आहे.
वाइल्ड आयरीस सॅटिन मिडी स्कर्ट हा रेशमी व्हिस्कोसपासून बनविला जातो. यामध्ये चमकदार गुलाबी आणि कोरल लाल रंगांचा अप्रतिम असा संगम आहे.
'ड्रॉन' ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार, वाइल्ड आयरिस सॅटिन मिडी स्कर्ट ड्रेसची किंमत 7 हजार 499 रुपये आहे.
अक्षताने ड्रेससोबत खूपच कमी दागिने घातले होते. त्यामध्ये कानात सोने होते. तर अक्षताने तिच्या केसांमध्ये एक सैल पोनीटेल बनवले होते.
Ganeshotsav 2023: बाप्पाच्या आगमनाला शास्त्रानुसार नेहरू टोपी का घालतात?