रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का?

Photo Credit मुंबई TAk

Arrow

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा येथे दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

तरुणांच्या दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. हा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर (29 मार्च) घडला.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

किराडपुऱ्यातील राम मंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. वाद वाढला आणि दगडफेक झाली.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली आणि गाड्या पेटवून दिल्या. यामध्ये मालमत्तेचं मोठं नुकसान झाले आहे.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

शहरातील परिस्थिती तणावपूर्ण असून, राम नवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

तसंच, जाळपोळ झालेल्या ठिकाणी काही मुस्लीम धर्मगुरूंनी रस्त्यावर उतरून शांतता राखण्याचे आवाहन केले. 

Photo Credit मुंबई TAk

Arrow

खासदार इम्तियाज जलील स्वतः राम मंदिरात पोहोचले आणि मंदिरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Photo Credit मुंबई TAk

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी