Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करणारे, KCR आहेत तरी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये भलेमोठे फ्लेक्स दिसतायेत. त्या फ्लेक्सवर लिहीलंय ‘अब की मार किसान सरकार’.

Photo Credit; instagram

Arrow

हे फेक्स महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याचे नाहीत तर, भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

केसीआर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवत आहेत. त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाचं दर्शन देखील घेतलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केसीआर यांचं पूर्ण नाव कल्वकुंतला चंद्रशेखर राव असं आहे. 1970 साली युथ काँग्रेसमधून राव यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली.

Photo Credit; instagram

Arrow

पुढे 1983 मध्ये राव यांनी तेलगु देसम पार्टीमध्ये प्रवेश केला. ते आंध्रप्रदेशच्या विधानसभेत आमदारही होते. त्यांनी राज्यमंत्री पदासह कॅबिनेट मंत्री पदही भूषवलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

27 एप्रिलल 2001 ला ते राजीनामा देत आणि तेलंगणा देसम पार्टीमधून बाहेर पडले. पुढे स्वतंत्र तेलंगणासाठी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाची स्थापना केली.

Photo Credit; instagram

Arrow

2009 साली स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं. 2013 साली लोकसभा आणि राज्यसभेत स्वतंत्र तेलंगणा राज्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केसीआर यांच्या पक्षाने 119 पैकी 63 जागांवर विजय मिळवला आणि केसीआर तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री झाले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर केसीआर यांनी मागे वळून पाहिले नाही ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले. अन् तेलगु राष्ट्र समितीचे नामकरण भारत राष्ट्र समिती (BRS) असे केले.

काचेसारखी चकचकीत दिसेल तुमची त्वचा, वापरा फक्त हा 'K' फॉर्म्युला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा