Nithyananda : कोण आहे नित्यानंदची शिष्या? जिने वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष
Photo Credit facebook
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) बैठकीत उच्चायुक्तांमध्ये बसलेली साध्वीची वेशभूषा केलेली ही महिला कोण?
Photo Credit facebook
साध्वी वेशभूषेतील या महिलेचा संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयात इंग्रजीत भाषण करतानाचा व्हिडीओ पाहिल्यावर ती कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे हे समजलं नाही.
Photo Credit facebook
नंतर एक फोटो नित्यानंदच्या ट्विटरवरून समोर आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्याच्या बैठकीत एका महिलेच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातून शिष्टमंडळ पाठवल्याचा दावा नित्यानंदने केला.
Photo Credit facebook
साध्वी महिलेने तिचं नाव माता विजयप्रिया नित्यानंद असं सांगितलं. कैलासाच्या व्हेरिफाईड फेसबुक अकाउंटनुसार, ती संयुक्त राष्ट्रात कैलासाची स्थायी रहिवासी असल्याचं समजतं.
Photo Credit facebook
विजयप्रिया नित्यानंदने तिचे मूळ निवासस्थान अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी शहर असल्याचं सांगितलं.नित्यानंदांच्या देशात तिचा राजनयिकाचा (डिप्लोमॅट) दर्जा आहे.
Photo Credit facebook
यावेळी विजयप्रियाने भारतावर टीका केली. विजय प्रिया यांनी असा दावा केला की भारत आपल्या सर्वोच्च गुरु नित्यानंदाचा छळ करीत आहे.
Photo Credit facebook
विजयप्रिया नित्यानंद व्यतिरिक्त, काल्पनिक देश कैलासातील आणखी 5 महिलांनी संयुक्त राष्ट्रांच्या या कार्यक्रमात भाग घेतला. संयुक्त राष्ट्र संघाने 19 व्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवर परिषद आयोजित केली होती.
Photo Credit facebook
भारतात बलात्काराचे आरोप असलेला नित्यानंद सध्या फरार आहे. नित्यानंदने प्रथम 'युनायटेड स्टेट ऑफ कैलास' नावाचा नवीन देश निर्माण केल्याचा दावा केला.
Photo Credit facebook
नित्यानंदचे प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पोहोचल्यानंतर सर्वजण चकित झाले. ते सर्व एनजीओचे नेटवर्क वापरून संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर पोहोचले होते.