PHOTO CREDIT; OCEANGATE/GETTY

Arrow

Titanic पाहायला गेले अन् स्वत:च झाले बेपत्ता, पाणबुडीसह 5 जण समुद्रात गायब 

PHOTO CREDIT; OCEANGATE/GETTY

Arrow

टायटॅनिकचे (Titanic)अवशेष पाहण्यासाठी ५ जण एका छोट्या पाणबुडीत (Submersible) बसून उत्तर अटलांटिक महासागरात गेले होते.

PHOTO CREDIT; OCEANGATE/GETTY

Arrow

मात्र खोल पाण्यात गेल्यानंतर पाणबुडीचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली आहे.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

सध्या, कॅनडा-अमेरिकेतील बचाव पथके बेपत्ता पाणबुडी आणि त्यातील लोकांचा शोध घेत आहेत. पाणबुडीमध्ये 3 ते 4 दिवसांसाठीचा ऑक्सिजन होता.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

ही पाणबुडी कॅनडातील न्यूफाउंडलँडच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना रविवारी तिचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

बेपत्ता झालेली पाणबुडी ही ओशियन गेट कंपनीची टायटन सबमर्सिबल आहे, जी ट्रकच्या आकाराची आहे. तिचे वजन 10 हजार किलोपेक्षा जास्त आहे.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या पाणबुडीतून आठ दिवसांच्या प्रवासाच्या तिकिटाची किंमत अडीच लाख डॉलर्स (सुमारे 2 कोटी रुपये) आहे.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

प्रवासादरम्यान, पाणबुडी टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्याजवळ समुद्राच्या खाली 3800 मीटरपर्यंत खाली जाऊ शकते.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

ब्रिटनचे अब्जाधीश हमिश हार्डिंग हे या पाणबुडीमध्ये आहेत. याशिवाय पाकिस्तानी वंशाचा उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगाही आहे.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

1912 मध्ये अमेरिकेला जाणारे टायटॅनिक जहाज एका हिमखंडावर आदळलेले. ज्यात 2200 लोक होते, त्यापैकी 1500 लोक मारले गेलेले.

Photo Credit; OceanGate/Getty

Arrow

टायटॅनिकचे अवशेष 1985 मध्ये सापडलेले. जे कॅनडातील न्यूफाउंडलँड येथील सेंट जॉन्सपासून 700 किमी अंतरावर अटलांटिक महासागरात आहे.

अमिषा पटेल चढली कोर्टाची पायरी, नेमकं प्रकरण काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा