धुळे हादरलं! आईनं दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई तक

Dhule Suicide : धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

Dhule suicide
Dhule suicide
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांची घटनास्थळी धाव

point

धुळे शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार

Dhule Suicide : धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात एक धक्कादायक घटना घडली. आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला. मृतांमध्ये आई  गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27) मुलगा दुर्गेश (वय 6) मुलगी दुर्वा (वय 3) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादांने नैराशात येऊन आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : पैसा-पाणी: AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाच्या नोकऱ्या वाचतील?

पोलिसांची घटनास्थळी धाव

विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी होते, घटनेची तत्काळपणे कोणालाच कल्पना झालेली नाही. तिघांचाही शोध घेताना कसलाही तपास झाला नाही. त्यांना संशय निर्माण झाला आणि अखेर विवाहित तिघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती पोलसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा तपास सुरु केला. 

आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर 

या प्रकरणात चौकशीतून समोर आले की, गायत्री ही अनेक दिवसांपासून मानसिक तणावातूनच आपले जीवन जगत होती. कुटुंबातील वाद, मतभेद आणि नैराश्यात वाढ झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नेमकं कारण काय? याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही.  या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी पुढील तपास सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे. 

धुळे शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार

अशातच आता धुळे शहरात आणखी एक  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. लैंगिक शोषणाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 59 लाख 99 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, सुकलाल रामभाऊ बोरसे (वय 53) याने 2023 पासून ओळख तयार करून आर्थिक मदतीचे आमिष दाखवले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp