Madha Lok Sabha Election 2024 : माढ्यात पवारांची ताकद वाढली, आणखीण एक धनगर नेता राष्ट्रवादीत

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bjp sanjay kshirsagar dhangar samaj leader sanjay kshirsagar join sharad pawar ncp madha lok sabha election 2024
मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
social share
google news

Sanjay Kshirsagar Join Sharad Pawar : राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशाने फडणवीसांना मोठा धक्का बसला आहे. तर शरद पवारांचं (Sharad Pawar) बळं चांगलचं वाढलं आहे. कारण क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) हे धनगर नेते, त्यांच्याआधी उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या रूपात आणखी एका धनगर नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.त्यामुळे माढ्यात शरद पवारांची ताकद वाढत चालली आहे.  (bjp sanjay kshirsagar dhangar samaj leader sanjay kshirsagar join sharad pawar ncp madha lok sabha election 2024) 

कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले संजय क्षीरसागर यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष वाढविण्यात मोलाचे योगदान दिले होते. मात्र भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करताना संजय क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले होते. भारतीय जनता पार्टीने मला अतिशय हीन वागणूक दिली. 2006 पासून भारतीय जनता पार्टीसाठी तालुक्यात आयुष्य वाहून घेतले. 2014 साली विधानसभा निवडणुकीत मला 54 हजार मतं पडली होती, तरी देखील मला अपमानास्पद वागणूक भाजपमध्ये दिली गेली. त्यामुळेच मी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला, असे क्षीरसागर यांनी सांगितले. 

हे ही वाचा : 'आपली खूण तुतारी वाजवणारा..', पवारांनी कोणाला केलं सावध?

कोण आहेत संजय क्षीरसागर? 

मोहोळ तालुक्यातील संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. संजय क्षीरसागर यांनी 2014 मध्ये भाजपकडून मोहोळ विधानसभा देखील लढवली आहे. या निवडणुकीत त्यांना 54 हजार मतं मिळाली होती. दरम्यान आता आता मोहोळ मतदार संघातून महाविकास आघाडीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांची लीड देण्याचा निर्धार केला असल्याचेही संजय क्षीरसागर यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sangli Lok Sabha : "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण

दरम्यान सोलापूर जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. भाजपचा हा पारंपारीक मतदार संघ आहे. भाजपच्या धोरणामुळे अनेक धनगर नेते भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत. काहीच दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. जानकर यांच्यानंतर आता संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्यात शरद पवारांच बळ वाढतं चाललं आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT