Sanjay Raut : 'दोन दिवसात मोठा स्फोट करणार', संजय राऊतांचा हाती काय लागलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut big revealation 800 crore land acquisition scam in nashik municiple corporation cm eknatha shinde
दोन दिवसात मोठा घोटाळा बाहरे काढणार असल्याचे संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे.
social share
google news

Sanjay Raut News : देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतायत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना आता शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत मोठा गौप्यस्फोट करण्याची तयारी करतात.दोन दिवसात मोठा घोटाळा बाहरे काढणार असल्याचे संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. विशेष म्हणजे या ट्विटमधून राऊत यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) एक्सवर नेमकं काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (sanjay raut big revealation 800 crore land acquisition scam in nashik municiple corporation cm eknatha shinde) 

संजय राऊत यांचे ट्विट जशाचं तसं 

पंतप्रधान मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण! नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री शिंदेंची लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन तो पर्यंत लाभार्थीनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटतआहे?

हे ही वाचा : 'मी पहाटे 5 वाजताच उठतो..', राज ठाकरेंनी सगळा दिनक्रमच..

संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर ट्विट करून या घोटाळ्याची माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत नगरविकास खात्यात 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोक या गैरव्यवहारात लाभार्थी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे या संबंधित कोणतेच पुरावे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले नाहीयेत. मात्र येत्या दोन दिवसात या घोटाळ्याबाबत स्फोट करेन, असा इशारा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. तसेच तिथपर्यंच लाभार्थ्यांनी शांत झोपावे, असा सल्ला देत, महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान संजय राऊत यांनी हा घोटाळा अद्याप पुर्णपणे उघड केला नाही आहे. त्यात आता ते दोन दिवसानंतर काय गोप्यस्फोट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा : 'एवढ्या जागा जिंकणार', पवारांनी सांगितलेला आकडा ठरणार खरा?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT