अंगारक योगामुळे 'या' राशीच्या लोकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागणार
मुंबई तक
02 Jul 2025 (अपडेटेड: 02 Jul 2025, 10:03 AM)
Astrology : 1 जुलैपासून अंगारक योग तयार होणार आहे. हे योग 28 जुलैपर्यंत राहणार आहेत. या काळात सिंह. वृश्चिक आणि मकर या तीन राशींसाठी समस्या वाढू शकतात.
ADVERTISEMENT


1/4
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती झाली आहे. यामुळे 1 जुलैपासून अंगारक योग तयार होणार आहे. हा योग 28 जुलैपर्यंत राहणार आहे. या काळात सिंह, वृश्चिक आणि मकर या तीन राशीतील लोकांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंधामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याचाच काही राशींवर नेमका कसा परिणाम होईल? याची एकूण माहिती जाणून घेऊयात.


2/4
सिंह राशी :
सिंह राशींच्या लोकांसाठी पहिल्या घरात योग तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे स्वभावात चिडचिडेपणा तयार होईल. क्रोध वाढेल, त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यासाठी हनुमान चालीसा पठण करा आणि लाल चंदनाचा टीळा लावा.
ADVERTISEMENT


3/4
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीतील लोकांच्या कर्मभावात हा योग निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होण्याची चिन्हे आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होवू शकते. नोकरी बदलणे टाळा, गाडी चालवताना काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.


4/4
मकर राशी :
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग आठव्या घरात तयार होईल. जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान आणि रक्तदाबाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद टाळावा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
