Maratha Reservation : "फडणवीसांचा मंत्र्यांवर दबाव", जरांगेंच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मुंबई तक

14 Jul 2024 (अपडेटेड: 14 Jul 2024, 02:44 PM)

follow google news

Maratha Reservation Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा सक्रिय झाले आहेत. नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, त्याचबरोबर सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जरांगे यांनी २० जुलैपर्यंतची वेळ सरकारला दिली असून, गरज पडल्यास पुन्हा मुंबईला येण्याचा इशाराही दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'मुंबई Tak'शी बोलताना जरांगे काय म्हणाले, पहा व्हिडीओ... (Manoj Jarange alleged that Devendra Fadnavis is putting pressure on the ministers to prevent Maratha community from getting reservation)

    follow whatsapp