बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार, नागरिक आक्रमक

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर बलात्काराच्या घटनेमुळे नागरिक आक्रमक झाले असून मोठे आंदोलन करण्यात आले आहे.

मुंबई तक

21 Aug 2024 (अपडेटेड: 21 Aug 2024, 08:29 AM)

follow google news

माणूसकीला काळीमा फासणारी घटना बदलापूरमध्ये घडली आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर त्या शिकत असलेल्या शाळेत बलात्कार झाला आहे. स्थानिक आमदार या प्रकरणाची दखल घेत नाहीत यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत आहेत. या संतापामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठे रेल रोको आंदोलन करण्यात आले. हजारो नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून निषेध नोंदवला. बदलापूरमधील आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारामुळे एकच खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करुन पोलिसांवरही दगडफेक केली. या आंदोलनामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूरमध्ये आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

    follow whatsapp