Badlapur मध्ये शाळेतील बलात्काराच्या घटनेनंतर कशी झाली पोलिसांची अडचण?

ठाण्यातील बदलापूरमध्ये शाळेतील बलात्कारानंतर संतप्त पालकांनी आंदोलन केलं. पोलिसांवर दगडफेक झाल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली.

मुंबई तक

21 Aug 2024 (अपडेटेड: 21 Aug 2024, 08:28 AM)

follow google news

ठाण्यातील बदलापूर शहरात मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर स्थानिक आणि पालकांनी रेल्वेसेवा रोखून धरली. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, परंतु आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या सर्व घटनेमुळे पोलिसांचा ताबा सुटला आणि परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेली. आंदोलकांच्या रोषामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

    follow whatsapp