लाइव्ह

Maharshtra Breaking News Live: ठरलं.. औरंगाबादमधून शिंदेच्या शिवसेनेने 'यांना' दिलं तिकीट!

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी देशभरात पार पडले. या सर्वच ठिकाणांवर सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर, देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी शांततेमध्ये मतदान पार पडले. अशाच राजकीय तसंच इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई Tak चा हा लाइव्ह ब्लॉग नक्की वाचा.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Apr 2024 (अपडेटेड: 20 Apr 2024, 05:32 PM)

follow google news

Marathi News LIVE Updates : भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना धमकवणारा पोलिसांच्या ताब्यात. आमदार फरांदे यांच्या विरोधात इंस्टाग्रामवर धमकी वजा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार फरांदे यांच्या जिवाला धोका निर्माण करणारी ऑडिओ क्लिप प्रसारित केली होती.

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:30 PM • 20 Apr 2024
    औरंगाबादमधून शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना तिकीट जाहीर

    औरंगाबाद (छ. संभाजीनगर) येथे महायुतीचा उमेदवार कोण असणार हे आता जाहीर करण्यात आलं आहे. सुरुवातीला हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र, अखेर तो शिवसेना (शिंदे गट) यांनाच मिळाला आहे. शिवसेनेने येथे त्यांचे राज्यातील मंत्री संदीपान भुमरे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये धनुष्यबाण विरुद्ध मशाल.. म्हणजेच संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी लढाई होणार आहे. याशिवाय एमआयएमचे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार देखील रिंगणार आहेत. त्यामुळे यंदाही येथे तिरंगी लढत होणार आहे.

       

  • 02:37 PM • 20 Apr 2024
    अजित दादांचा दरारा बघायला मिळत नाही हे खेदजनक- अमोल कोल्हे

    महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. 'भाजपमध्ये जे गेले त्यांची अडचण झालेलीच आहे. भाजपसोबत अजित दादा गेल्यानंतर त्यांचा दरारा बघायला मिळत नाही, हे खेदजनक आहे. संजय राऊत यांचं विधान मी ऐकलं नाही. अशी विधान माझ्या बाबत झाली, तेव्हा हाच प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारायला हवं होतं. पुणे- नाशिक महामार्गावरील परिस्थिती बदली आहे,' असं अमोल कोल्हे म्हणाले.

     

  • 01:06 PM • 20 Apr 2024
    काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही - पंतप्रधान मोदी

    इंडिया आघाडीचे लोक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत... काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही... विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला नाही...

     

  • 12:14 PM • 20 Apr 2024
    पंतप्रधान पद महाराष्ट्राला का मिळू नये -संजय राऊत

    उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल, असे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील.महाराष्ट्राला का मान मिळू नये, असे ते म्हणाले.

  • 12:11 PM • 20 Apr 2024
    काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही- पंतप्रधान मोदी

    इंडिया आघाडीचे लोक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला नाही. असं मोदी नांदेडमधील प्रचार सभेत बोलले.

  • 11:25 AM • 20 Apr 2024
    सत्तेत असताना काँग्रेसने तिजोरी लुटली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    'चिखलीकर आणि बाबुराव कदमांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल. आमच्याकडे मोदी गॅरंटी आहे, असं जनता म्हणतेय. मोदींकडून देशात रामराज्य आणण्याचा प्रयत्न होत आहे. मोदीच फक्त देशाला महासत्ता बनवू शकतात. सत्तेत असताना काँग्रेसने तिजोरी लुटली.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

  • 11:18 AM • 20 Apr 2024
    विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता

    विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता आहे. विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज परत न घेतल्यास काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सांगलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे

  • 09:56 AM • 20 Apr 2024
    उद्धव ठाकरे दलित विरोधी; मिलिंद देवरा यांचा आरोप!

    मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणालेत की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि शिवसेना (UBT) गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे.

  • 08:54 AM • 20 Apr 2024
    महिलांना द्रौपदी म्हणणारे अजित पवार दुर्योधन- अभिजीत बिचुकले

    'बारामतीच्या सुनेत्रा वहिनींनी अजित पवारांचे कान पिळले पाहिजेत त्यांना महिलांमध्ये भविष्यात द्रोपदी दिसू लागले आहेत अजित पवार काळजी करू नका तुम्हाला जर द्रौपदी दिसू लागले असतील तर तुमच्यातला दुर्योधन लोकांना दिसतोय आणि मी कृष्ण म्हणून दुर्योधनाचा नाश नक्कीच करेन', असा इशारा अजित पवारांना बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी दिला. सातारा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी दाखल केली आहे येत्या काळात दूरदर्शन हे चिन्ह घेऊन संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचे अभिवचन देखील अभिजीत बिचुकलेंनी दिले आहे.

follow whatsapp