Lok Sabha Election 2024 Maharashtra Live : शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पण, त्यापूर्वीच बरेच अंदाज निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.
तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले. दुसरीकडे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधारी एनडीए आघाडीला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न केले.
लोकसभ निवडणुकीच्या निकालाबद्दल विश्लेषक काय म्हणताहेत आणि इतर महत्त्वाचे अपडेटस् वाचा...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 02:23 PM • 30 May 2024Maharashtra news : पुणे अपघात प्रकरणात सुषमा अंधारेंकडून खोटे आरोप- शंभूराज देसाई
'आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क पुरावे द्या हवेत तीर मारू नका. धंगेकर अंधारेंकडून फक्त स्टंटबाजी केली जातेय. सुषमा अंधारेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं. तसंच धंगेकर आणि अंधारेंना नोटीस बजावली आहे. ' असं शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत म्हणाले.
- 02:16 PM • 30 May 2024Maharashtra News : आव्हाडांच्या विरोधात मनसेची घोषणाबाजी
नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवत फोटोंची शेकोटी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा विरोधात मनसे ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी दिला आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्या ठिकाणी पोस्टर फाडले तिथे जाऊन नाकाराकडून माफी मागावी अन्यथा सिन्नर आणि मुंब्रा येथील आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला.
- 10:53 AM • 30 May 2024Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावणार
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेने 16 मार्चपासून देशभरात सुरू झालेला निवडणुकीचा जल्लोष आता आज संध्याकाळी म्हणजेच 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता थांबणार आहे. यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारही संपणार आहे. ज्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. या कालावधीत आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 जागांसाठी मतदान होणार आहे.
- 10:51 AM • 30 May 2024Maharashtra News : विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक. हे सरकार टेंडर आणि टक्केवारी मध्ये व्यस्त असणारे सरकार आहे. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन या सरकारने 25 हजार कोटीचे टेंडर काढले. हे सरकार टेंडरबाज सरकार आहे. या सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मात्र मदत केली नाही असं विजय वडडेट्टीवार म्हणाले.
- 10:50 AM • 30 May 2024Pune News : पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण, 'ते' ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचं!
अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिने मुलाला वाचवण्यासाठी स्वत:च्या रक्ताचा नमुना दिला. जो तिच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आला. मुलाची चाचणी झाली तेव्हा ती ससून रुग्णालयात उपस्थित होती. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक केल्यानंतर हे गुपित उघड झालं. शिवानी अग्रवाल सध्या फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
- 10:09 AM • 30 May 2024Maharashtra News : जितेंद्र आव्हाडांच्या बचावासाठी जयंत पाटील आले धावून!
"जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांवरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे" जितेंद्र आव्हाड यांच्या बचावासाठी जयंत पाटील सरसावले.
- 08:12 AM • 30 May 2024Maharashtra Live : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, दोन गुन्हे दाखल!
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला. मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. हा प्रकार अनावधानाने झाल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पण याचे पदडास काही वेगळेच उमटताना दिसत आहेत. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंही आज आंदोलन करून आव्हाड यांचा निषेध नोंदवणार आहे. तसंच पुण्यात त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रायगडमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
