Lok sabha Election 2024 : कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार

प्रशांत गोमाणे

• 11:01 AM • 20 Dec 2023

कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी गुजरातमधील द्वारका येथे माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ती म्हणाली, जर देवाचा आशीर्वाद असेल तर ती नक्कीच निवडणूक लढवेल. या तिच्या वक्तव्यानंतर ती राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

kangana ranaut contest 2024 lok sabha election on bjp ticket father amardeep ranaout reveal this politics

kangana ranaut contest 2024 lok sabha election on bjp ticket father amardeep ranaout reveal this politics

follow google news

Kangana Ranaut contest 2024 lok sabha election : बॉलिवूडची क्विन, धाकड गर्ल कंगना रणौतने मोठा पडदा चांगलाच गाजवला आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकाच्या हृद्यात एक वेगळीच छाप सोडली आहे. आता बॉलिवूड (Bollywood गाजवलेली हीच अभिनेत्री राजकारणात एन्ट्री मारणार असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसापूर्वीच कंगनाने (Kangana Ranaut) देवाचा आशीर्वाद असेल तर नक्कीच निवडणूक लढवेन, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर आता कंगनाच्या वडिलांनी तिच्या निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. इतकच नाही तर त्यांनी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याची देखील माहिती दिली आहे. (kangana ranaut contest 2024 lok sabha election on bjp ticket father amardeep ranaut reveal this politics)

हे वाचलं का?

कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सूरू होती. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळत नव्हता. अखेर वडील अमरदीप रणौत यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता कंगना रणौत निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे, हे पक्क झालं आहे.

हे ही वाचा : Jagdeep Dhankhar : ‘मी हे 20 वर्षांपासून सहन करतोय’, PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन

कंगना निवडणूक लढवणार असली तरी ती फक्त भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावरच लढणार आहे. मात्र, ती कुठून निवडणूक लढवायची हे पक्ष ठरवेल, असे कंगना रणौतचे वडील अमरदीप रणौत यांनी सांगितले आहे. तत्पुर्वी कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी गुजरातमधील द्वारका येथे माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ती म्हणाली, जर देवाचा आशीर्वाद असेल तर ती नक्कीच निवडणूक लढवेल. या तिच्या वक्तव्यानंतर ती राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी कंगनाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची कुल्लू येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर कंगनाच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेला आणखीणच गती मिळाली होती. त्यानंतर आता वडील अमरदीप रणौत यांनी कंगना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता कंगनाची राजकीय एन्ट्री पाहण्यास चाहते आतूर झाले आहेत.

हे ही वाचा : Mla Disqualification : 7 ठरावांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं, शिंदेंच्या वकिलांनी पकडलं कात्रीत

‘या’ जागेवरून निवडणूक लढवणार?

कंगना रणौत गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, चंदीगड किंवा हिमाचल प्रदेश या कोणत्याही राज्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबतचा काहीही निर्णय झालेला नाही. तसेच कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील भांबला गावची रहिवासी आहे आणि तिने मनालीमध्ये घरही बांधले आहे. तिचे कुटुंबही मनाली येथेच राहते. कंगना आणि तिचे संपूर्ण कुटुंब नेहमीच भाजपचे समर्थक राहिले आहे.

दरम्यान कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायच झालं तर, कंगणा तिच्या आगामी इमरजेन्सी सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगणाच्या या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    follow whatsapp