SIM Card खरेदी करताय! नवीन वर्षापासून नियमात काय बदल होणार?

मुंबई तक

31 Dec 2023 (अपडेटेड: 31 Dec 2023, 01:51 PM)

सरकारने आता मोबाईसाठी लागणाऱ्या सिम कार्डबाबत नवीन नियम लागू केला आहे. हा नियम 1 जानेवारीपासून लागू होत असून त्यामुळे होणारी ऑनलाईन फसवणूक थांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Virtual KYC will have to be filled while getting a new SIM card Attempt to establish criminal base online

Virtual KYC will have to be filled while getting a new SIM card Attempt to establish criminal base online

follow google news

New SIM card rules: सध्याचं जग तंत्रज्ञानांच जग आहे. त्यामुळे मोबाईलमध्येही अनेक मोठमोठे बदल होत आहे. मोबाईलमध्ये महत्वाचे आणि मोठे बदल होत असले तरी मोबाईलसाठी (Mobile) अत्यंत गरजेचे आहे ते सिम कार्ड. त्यासाठी आता 1 जानेवारी 2024 पासून भारतात सिम कार्ड (SIM card) खरेदी करताना तुम्हाला नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांसंबंधीची माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, सिम कार्ड घेताना तुम्हाला आता व्हर्च्युअल केवायसी (KYC) भरावी लागणार आहे.

हे वाचलं का?

फसवणूक थांबणार

सिम कार्ड घेताना नवीन नियम जाहीर करण्याआधी दूरसंचार विभागाकडून डिसेंबर महिन्यापमध्ये अधिसूचना देण्यात आली होती. त्यामध्ये म्हटले होते की, पेपरवर आधारित असलेली केवायसीमध्ये 1 जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे. सरकारने हा नियम ऑनलाईन पद्धतीने होणारी फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने केलेल्या या निर्णयामुळे बनावट सिम कार्डच्या खेरदी विक्रीला मोठा आळा बसणार आहे.

हे ही वाचा >> Mumbai Local Video : लक्झरी कार सोडून उद्योगपतीचा मुंबई लोकलमधून प्रवास, कारण…

पॉइंट ऑफ सेल

दूरसंचार विभागाने केलेल्या नव्या नियमामुळे भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास त्या तात्काळ सोडवण्यासाठी मदत होणार आहे. सरकारकडून 1 जानेवारीपासून जे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये विक्रेत्याला विक्रीच्या ठिकाणाची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात कधी सिमकार्डबाबत कोणत्याही गोष्टी घडल्या तर पॉइंट ऑफ सेलमुळे त्या प्रकरणाची सोडवणूक होण्यास मदत होणार आहे.

ही नोंदणी महत्वाची

सरकारच्या या नवीन नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांना स्वतःची नोंदणी करण्यासाठी फ्रँचायझी, वितरक आणि पॉइंट-ऑफ-सेल (PoS) एजंटांची नोंद असणे महत्वाचे असणार आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ही नोंदणी करण्यासाठी टेलिकॉम डीलर्स आणि एजंटना एक वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे.

कॉल, मेसेजवरून फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यासाठी वापरल्या जाणारे प्रकारही भयानक आहेत. ज्या लोकांची फसवणूकी केली जाते, त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल व मेसेज करणे असे प्रकार केले जातात. त्यानंतर त्याच लोकांच्या बँक खात्यातून लाखो रुपयांची फसवणूकही केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

    follow whatsapp