दोन तरुणींसोबत जीवघेणे स्टंट, मुंबई पोलिसांनी ‘त्या’ तरुणाला केली अटक

मुंबई तक

03 Apr 2023 (अपडेटेड: 03 Apr 2023, 07:07 AM)

Stuntman with two girls video : दोन तरुणींना बाईकवर बसवून मुंबईतील रस्त्यावर जीवघेणे स्टंट करतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या तरुणाला आता मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai police arrested a youth who stunts with two Girl seated on his two-wheeler. accused, identified as Faiyaz Qadri.

Mumbai police arrested a youth who stunts with two Girl seated on his two-wheeler. accused, identified as Faiyaz Qadri.

follow google news

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ होता मुंबईतील. दोन तरुणींना बाईकवर बसवून एक तरुण काळाचे ठोके चुकवणारे जीवघेणे स्टंट करताना या व्हिडीओत दिसते. बाईकवर स्टंट करणाऱ्या या तरुणाला आता मुंबई पोलिसांनी शोधून काढले असून, अटक केली आहे. सध्या पोलीस या तरुणासोबत असलेल्या त्या दोन तरुणींचा शोध घेत आहेत. (Stuntman with two girls arrested by mumbai police)

हे वाचलं का?

मुंबईमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला. एक तरुण बाईकवर एका तरुणीला समोर, तर दुसऱ्या तरुणीला मागे बसवून जीवघेणे स्टंट करत असल्याचा हा व्हिडीओ होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्या तरुणाला रविवारी (2 एप्रिल) रात्री अटक केली.

सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. pothole warriors नावाने असलेल्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर केला आणि मुंबई वाहतूक पोलिसांना टॅग केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

बाईकवर स्टंट करणारा तो तरुण कोण?

मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणींसोबत स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव फैयाज कादरी असे आहे. त्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. बीकेसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा प्रकार घडला होता.

Stuntman with two girls video : व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे की, तरुण दोन तरुणींना बाईकवर बसवून स्टंट करत आहे. एक तरुणी समोर बसली आहे, तर दुसरी मुलगी तरुणाच्या मागे बसली आहे. त्याचबरोबर एका चित्रपटातील डॉयलॉग ऐकायला येत आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

आरोपीविरुद्ध यापूर्वीही दाखल झाले आहेत गुन्हे

पोलिसांनी अटक केलेल्या फैयाज कादरीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. मुंबई पोलीस झोन 8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित यांनी सांगितले की, “आरोपी वडाळाचा रहिवासी आहे. फैयाज अहमद अजीमुल्ला कादरी (वय 24) असं त्याचे पूर्ण नाव आहे. त्याच्याविरुद्ध वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात आणि अँटोप हिल पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.”

VIDEO : लग्नमंडपातला स्टंट नवरीला महागात पडला, संपूर्ण तोंडच….

“अटकेपासून वाचवण्यासाठी तो घराचा पत्त बदल होता. पोलिसांनी त्याला आता त्याच्या साकीनाका येथील घरातून अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपासू सुरू असून, पोलीस आता त्याच्यासोबत असलेल्या तरुणींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत,” असं दीक्षित यांनी सांगितले.

    follow whatsapp