बेसमेंटमध्ये तब्बल 650 लॉकर्स, कोट्यवधी रुपये जप्त; माजी IPS अधिकाऱ्याच्या घरावर IT चा छापा

मुंबई तक

• 12:52 PM • 01 Feb 2022

नोएडा: एकीकडे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. पण दुसरीकडे काही लोक असे असतात ज्यांचे बजेट एव्हरग्रीन असते. सध्या असे लोक आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. नोएडा येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग यांच्या घरावर मागील 3 दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. नोएडा येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग यांच्या घरावर मागील 3 […]

Mumbaitak
follow google news

नोएडा: एकीकडे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. पण दुसरीकडे काही लोक असे असतात ज्यांचे बजेट एव्हरग्रीन असते. सध्या असे लोक आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. नोएडा येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग यांच्या घरावर मागील 3 दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरू आहेत.

हे वाचलं का?

नोएडा येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग यांच्या घरावर मागील 3 दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. त्यांचा मुलगा खाजगी लॉकर फर्म चालवतो. छापेमारी दरम्यान या लॉकर्समधून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे.

वास्तविक आरएन सिंग यांचा मुलगा आपल्या घराच्याच बेसमेंटमध्ये खाजगी लॉकर फर्म चालवतो. हे लॉकर्स भाड्याने दिले जातात. प्राप्तिकर विभागाने येथील शोध मोहिमेत कोट्यवधी रुपयांची क्रॅश जप्त केली आहे. हे पैसे कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या बेसमेंटमध्ये तब्बल 650 लॉकर असल्याचं सांगितलं जात आहे.

आरएन सिंग हे यूपीचे डीजी प्रोसिक्युशन होते. त्यांचं असं म्हणणं आहे की, ही फर्म त्यांचा मुलगा चालवतो तो कमिशनच्या आधारावर हे लॉकर भाड्याने देतो. त्यांचे देखील 2 लॉकर आहेत पण त्यातून काहीही सापडलेलं नाही.

छाप्यादरम्यान माजी आयपीएस आरएन सिंह म्हणाले, ‘मी सध्या माझ्या गावात होतो, मला माहिती मिळाली की आयकर पथक घरी तपासासाठी आले आहे. म्हणून मी तात्काळ येथे आलो. मी आयपीएस अधिकारी होतो. मागील अनेक वर्षांपासून माझा मुलगा येथे राहतो आणि आम्ही देखील इथे येऊन कधीकधी राहतो, माझा मुलगा तळघरात खाजगी लॉकरचं सगळं कामकाज पाहतो.’

अत्तर व्यापारी पियूष जैनच्या घरात 257 कोटी, 20 किलोहून जास्त सोनं जाणून घ्या काय काय हाती लागलं?

माजी आयपीएस आरएन सिंग पुढे म्हणाले, ‘माझा मुलगा लॉकर भाड्याने देतो, जशाप्रकारे बँका देतात. तो ग्राहकांना बँकांपेक्षा जास्त चांगली सुविधा देतो. यामध्ये आमच्याकडे दोन लॉकर्स खासगी आहेत. आतमध्ये अद्यापही चौकशी सुरू आहे. जवळपास सर्व लॉकर्स तपासले गेले आहेत. आमच्याकडे याबाबत सर्व तपशील आहेत. दरम्यान, आयकर टीमला आमच्या घरात काही दागिने सापडले आहेत. पण त्याची देखील सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत.’ असं ते म्हणाले.

दरम्यान, घराच्या खाली अशा पद्धतीने बेसमेंटमध्ये लॉकर बनवून त्यामध्ये कोट्यवधी रुपये नेमके कसे ठेवले त्याला कोणी परवानगी दिली या सगळ्याची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.

    follow whatsapp