Solapur जिल्ह्यात Online शिक्षणासाठी 80 हजार विद्यार्थ्यांकडे नाही Mobile

मुंबई तक

• 12:46 PM • 09 Jul 2021

राज्य सरकारने शाळा बंद पण शिक्षण सुरू या धोरणानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुरू केले आहे. मात्र यामध्ये एक मोठी अडचण समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार ग्रामीण भागातील एकट्या सोलापूर जिल्ह्यात 80 हजार विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईंडच काय पण साधा ही मोबाईलच नाही ही गंभीर बाब समोर आली आहे. मोबाईलच नाही तर ही […]

Mumbaitak
follow google news

राज्य सरकारने शाळा बंद पण शिक्षण सुरू या धोरणानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुरू केले आहे. मात्र यामध्ये एक मोठी अडचण समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार ग्रामीण भागातील एकट्या सोलापूर जिल्ह्यात 80 हजार विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईंडच काय पण साधा ही मोबाईलच नाही ही गंभीर बाब समोर आली आहे. मोबाईलच नाही तर ही मुले शिक्षण घेणार कशी? यावर पर्याय शोधत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एक अभियान सुरू केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही इंटरनेट नाही अशा मुलांना घरी जाऊन, झाडाखाली , पारावर, गावातील मंदिरात जाऊन शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश शिक्षकांना दिल्याने आता ही मोबाईल नसणारी मुलं गावातील पारावर, झाडाखाली , मंदिरात अभ्यासाचे धडे रंगवत आहेत.

हे वाचलं का?

या एकट्या सोलापूर जिल्ह्यात जर 80 हजार विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतील तर राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये या परिस्थितीचा प्रशासनाकडून अभ्यास करण्यात आला आहे का? कोणत्या उपाय योजना त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत आहेत. याचा आढावा राज्य सरकारने घेणे आवश्यक असून प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना सोलापूरचा ‘पारावरची शाळा’ हा शिक्षणाचा पॅटर्न राबविला तरच शाळा बंद पण शिक्षण सुरू हे अभियान यशस्वी होईल .

महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यापासूनच म्हणजेच मार्च 2020 शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. तिथे प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेता आलेलं नाही. दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामध्ये झालेले मृत्यू यामुळे यावर्षीही शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. अशात सरकारने मागच्या वर्षापासूनच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. मात्र एकट्या सोलापूर जिल्ह्यात 80 हजार विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. स्मार्ट फोनचा तर प्रश्नच येत नाही. साधा मोबाईलही नाही त्यामुळे पारावरची शाळा हा पॅटर्न राबवला जातो आहे. हा पॅटर्न राज्यभरात जिथे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही अशा ठिकाणीही राबवण्याची गरज आहे अशीही चर्चा होते आहे.

    follow whatsapp