भोंग्यांचा वाद : मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धीभेद करत आहे – आम आदमी पक्षाचा आरोप

मुंबई तक

• 10:50 AM • 17 Apr 2022

– मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनिधी मशिदीवरील भोंगे, अझान, हनुमान चालीसा या मुद्द्यांवरुन गेल्या काही दिवसांत राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी आपल्या सभेत या मुद्द्यांना हात घालत जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं. आता या वादात आम आदमी पक्षाने उडी घेतली आहे. मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धीभेद करत असून सर्वधर्मातील लोकांना एकत्रित […]

Mumbaitak
follow google news

– मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनिधी

हे वाचलं का?

मशिदीवरील भोंगे, अझान, हनुमान चालीसा या मुद्द्यांवरुन गेल्या काही दिवसांत राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी आपल्या सभेत या मुद्द्यांना हात घालत जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं. आता या वादात आम आदमी पक्षाने उडी घेतली आहे.

मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धीभेद करत असून सर्वधर्मातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी आम आदमी पक्ष चौकाचौकात राष्ट्रगीत वाजवणार असल्याचं आम आदमी पक्षाचे सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितलं.

पुणे: पुन्हा एकदा भोंग्याचं राजकारण, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा!

“ऑगस्ट 2016 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही एका धर्माबद्दल न बोलता सर्व धार्मिक स्थळावरील धवनिक्षेपकाच्या आवाजाला 75 डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धिभेद करत आहे. प्रत्येक मंदिरांमध्ये सकाळच्या आरतीसाठी भोंगे लावलेत जातात.”

…लक्षात ठेवा, देवही तुमचा उद्देश बघतोय ! हनुमान चालीसा प्रकरणात महंतांनी पिळले कान

महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडुन त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपासह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. म्हणूनच सर्वच भोंग्याचा निषेध करत सर्व जाती धर्माना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत आम आदमी पक्ष चौकाचौकात वाजवणार असल्याचं पक्षाचे सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितलं.

धनंजय शिंदे कल्याणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांवर बोलत असताना शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली शहराची लूट ठाण्याच्या बंटी-बबलीने केल्याचं म्हणत नाव न घेता जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे या जोडगोळीवर टीका केली. महागाई वाढण्यासाठी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारही तितकंच जबाबदार असल्याचं धनंजय शिंदे म्हणाले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना आम आदमी पक्ष्याच्या वतीने पक्ष बळकटीकरण्यासाठी आज कल्याणमध्ये मेळावा आयोजित केला होता. यात आपचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दीपक सिंगल, गोव्याचे माजी उधोगमंत्री महादेव नाईक, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी कार्यकर्त्याना पक्ष बळकटीकरणासाठी मार्गदर्शन केले. तसेच कल्याण मधील कॉग्रेस आणि भाजप मधील कार्यकर्त्यांनी आप मध्ये प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष धनंजय जोगदंड, दीपक दुबे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    follow whatsapp