Hindenburg Report ने खळबळ : अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण कायम!

मुंबई तक

• 05:46 AM • 27 Jan 2023

मुंबई : अमेरिकास्थित फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म Hindenburg च्या अहवालानंतर अदानी समूह (Adani Group) आणि शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Share Market) सुरु झालेली घसरण आज (शुक्रवारी) कायम राहिली. बुधवारपेक्षाही मोठी घसरण आज पाहायला मिळत आहे. अदानी समूहाचे सगळे शेअर्स विक्रीसाठी शर्यतीत उतरलेले दिसत आहेत. या अहवालाचा शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : अमेरिकास्थित फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म Hindenburg च्या अहवालानंतर अदानी समूह (Adani Group) आणि शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Share Market) सुरु झालेली घसरण आज (शुक्रवारी) कायम राहिली. बुधवारपेक्षाही मोठी घसरण आज पाहायला मिळत आहे. अदानी समूहाचे सगळे शेअर्स विक्रीसाठी शर्यतीत उतरलेले दिसत आहेत. या अहवालाचा शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे. (Gautam Adani suffered a loss of Rs 50,000 crore due to the report of forensic financial research firm Hindenburg)

हे वाचलं का?

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये १६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. शेअर घसरुन १ हजार ५६४ रुपयांपर्यंत खाली आला. ही घसरण म्हणजे तब्बल ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी मानली जात आहे. तर अदानी टोटल गॅसचा शेअरही १६ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. याशिवाय आजपासून अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ उघडण्यात आला. पण त्याआधीच हा स्टॉक ६ टक्क्यांहून अधिक घसरला असून एफपीओच्या किमतीच्या जवळपास पोहोचला. अदानी पॉवर आणि अदानी विल्मारमध्ये ५-५ टक्के लोअर सर्किट लागले आहे. तर अदानी पोर्टच्या शेअरमध्ये ५ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे.

Mood Of the Nation: भारतीयांच्या मनात काय?, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे

बुधवारी फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी उद्योग समूह आणि गौतम अदानी यांना ५० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. आज त्यापेक्षा मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंडेनबर्गने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात अदानींच्या कंपन्यांमध्ये शॉर्ट पोझिशन असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या कर्जावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच अदानी समूहाच्या ७ मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्य ८५ टक्क्यांपेक्षा ओव्हरव्हॅल्यू असल्याचा दावाही याच अहवालात करण्यात आला आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारण्यात आले आहेत. या अहवालामुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्या असल्याचं दिसून येत आहे. मात्र, अहवाल प्रसिद्ध होताच अवघ्या काही तासांत अदानी समूहाने अहवालाला सडेतोड उत्तर दिलं. अदानी समूहाने हा अहवाल ‘बकवास’ असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा संपूर्ण अहवाल फेटाळून लावला असून याला द्वेषभावनेतून तयार करण्यात आल्याचंही म्हटलं आहे.

Mood Of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या नंबरवर?

अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंग म्हणाले, ‘हिंडनबर्ग रिसर्चने आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्याचा किंवा तथ्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न न करता हा अहवाल प्रकाशित केला. त्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. मात्र हा अहवाल पूर्णतः चुकीची माहिती तसचं जुन्या, निराधार आणि बदनामीकारक आरोपांच्या आधारावक द्वेषपूर्ण भावनेतून बनविण्यात आला आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयानेही याची पडताळणी केली असून तो फेटाळून लावला आहे. याशिवाय अदानी समूह या अमेरिकन फर्मवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात असल्याचही त्यांनी सांगितलं.

फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्ग :

दरम्यान, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर हिंडेनबर्ग या संस्थेबद्दलचीही माहिती शोधली असता या संस्थेचा इतिहासच समोर आला. हिंडनबर्ग रिसर्च ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था असून इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करण्याचं काम करते. याची स्थापना २०१७ मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली आहे. हिंडेनबर्ग संस्थेकडे कॉर्पोरेटमधील चुकीची काम शोधण्याचा आणि संबंधित कंपन्यांविरोधात खटला भरण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.

    follow whatsapp