Anil Parab Vs Kirit Somaiya : संघर्ष पेटला! म्हाडा कार्यालयाबाहेर ठिय्या

मुंबई तक

• 09:00 AM • 31 Jan 2023

Thackeray faction leader anil parab in mhada office : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (bjp Leader kirit somaiya) यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा आज (31 जानेवारी) संघर्ष शिगेला गेला. अनिल परबांनी वांद्रेतील म्हाडा सोसायटीतील कार्यालय हटवल्यानंतर थेट म्हाडा कार्यालय (Mhada Office) गाठलं. शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या सुरू […]

Mumbaitak
follow google news

Thackeray faction leader anil parab in mhada office : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (bjp Leader kirit somaiya) यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा आज (31 जानेवारी) संघर्ष शिगेला गेला. अनिल परबांनी वांद्रेतील म्हाडा सोसायटीतील कार्यालय हटवल्यानंतर थेट म्हाडा कार्यालय (Mhada Office) गाठलं. शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या सुरू केला.

हे वाचलं का?

म्हाडा कार्यालयाबाहेर काय घडलं? बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

गेल्या अडीच वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. वांद्रे परिसरातील गांधीनगर येथील म्हाडा इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून कार्यालय सुरू केल्याची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार किरीट सोमय्यांनी केली होती. या प्रकरणावरून आता परब सोमय्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.

म्हाडाकडून बांधकाम नियमित करण्यास नकार देण्यात आल्यानंतर अनिल परब यांनी स्वतःच वांद्रेतील कार्यालय पाडलं. हे कार्यालय पाडल्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भूमिका मांडली.

त्यानंतर अनिल परब हे समर्थकांसह म्हाडा कार्यालयात गेले. कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या दिला. त्यानंतर अनिल परब हे म्हाडा कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले. दरम्यान, अनिल परब अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर समर्थकांची सोमय्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू आहे. तर काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अनिल परबांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी…

याप्रकरणावर बोलताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “मूळात अनधिकृत बांधकाम केल्यानंतर ते मी तोडलं की, म्हाडाने तोडलं, याच्या नावावरून गोंधळ घालणं म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे. मूळात अनधिकृत बांधकाम करायलाच नको होतं.”

अतुल भातखळकर पुढे असंही म्हणाले, “खरंतर अनधिकृत बांधकाम केलं, याबद्दल अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे, ही आमची पुढची मागणी आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाब होता असं त्यांना वाटतं असेल, तर ते उच्च न्यायालयात का गेले नाही. वरच्या कोर्टात ते जाऊ शकले असते.”

“अनिल परब यांच्या वक्तव्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांनी हेही सांगितलं की, मी रिसॉर्ट बांधलं नाही. ती जमीन माझी नव्हती. आम्ही सगळी कागदपत्रं सादर केली होती. अनिल परब यांच्या वक्तव्याला कुणीही गांभीर्यानं घेत नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे”, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp