बाळासाहेब ठाकरेंना भारत सरकारने भारतरत्न द्यावा, प्रवीण तोगडियांची मागणी

मुंबई तक

• 10:57 AM • 06 Dec 2021

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर प्रभू रामचंद्र मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे चार जण होते. बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवलं पाहिजे. राम मंदिर आंदोलनात या चौघांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता या चौघांनाही भारतरत्न देऊन गौरवलं पाहिजे असं तोगडिया यांनी […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

हे वाचलं का?

प्रभू रामचंद्र मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे चार जण होते. बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवलं पाहिजे. राम मंदिर आंदोलनात या चौघांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता या चौघांनाही भारतरत्न देऊन गौरवलं पाहिजे असं तोगडिया यांनी म्हटलं आहे. तोगडिया यांनी ही मागणी याआधीही केली होती. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना हे वक्तव्य आणि ही मागणी तोगडिया यांनी केली आहे.

काय म्हणाले प्रवीण तोगडिया?

राम मंदिर आंदोलनासंदर्भात बोलताना बाबरी पाडल्याचा गर्व आहे मला आहे. आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. शौर्य दाखवत होते. संघर्ष करत होते. त्यापैकी 6 डिसेंबरचं शौर्य हे तीन मुद्द्यांसाठी अद्वितीय आहे. आम्हाला गर्व बाबरी पाडण्यावर. जिथे एकेकाळी मशिद होती तिथे मंदिर उभारलं जातं याचा आम्हाला गर्व आहे. मी यामध्ये माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, डॉक्टरकीचा पेशा आणि त्यामधून मिळाला असते असे कोट्यावधी रुपये मी या कामासाठी सोडून दिल्याचा मला गर्व आणि आनंद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी करियर, पैसे बनवण्यासाठी जाण्याऐवजी रामाच्या जन्मभूमीमध्ये मंदिर बनवण्यासाठी पुढे आले याचा मला गर्व आहे असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरे पुढे नेऊ शकतात का?

‘चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं. यापैकी पहिले आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरे आहेत अशोक सिंघल, तिसरे योगी आदित्यनाथ यांचे गुरु गोरख पीठाधीश्वर अवैधनाथजी तर चौथे होते अयोध्येचे रामचंद्र परमहंस असं तोगडिया यांनी सांगितलं.या चौघांसोबत माझं खास नातं आहे. या चौघांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेन की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही. या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा आणि ज्या राम मंदिराच्या नावावर सत्तेत आला आहात त्याची ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी करावी’ असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.

काय घडलं होतं 6 डिसेंबर 1992 ला?

अयोध्येत आजपासून 29 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी बाबरी मशिद पाडण्यात आली होती. या प्रकरणी अनेक कारसेवक, विश्वहिंदू परिषद, भाजप कार्यकर्ते, शिवसैनिक यांचा सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यावर या प्रकरणी खटलाही भरवण्यात आला होता. 6 डिसेंबर 1992 ला रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, अब भी जिसका खून न खौला, खून नहीं वो पानी है जो राम के काम न आये वो बेकार जवानी है अशा घोषणा देत बाबरी मशिद पाडण्यात आली होती. देशात कोर्टात सर्वात जास्त काळ चाललेलं हे प्रकरण आहे. याप्रकरणी 2019 ला निकाल लागला. आता या जागी प्रभू रामचंद्रांचं मंदिर आकार घेतं आहे.

    follow whatsapp