Udayanraje Bhosale : महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचं कलम लावा

मुंबई तक

• 12:59 PM • 30 Nov 2022

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा अपमान करण्यांविरोधात देशद्रोह, राष्ट्रदोहाच्या कलमांर्गत गुन्हा दाखल करावा. तसंच महापुरुषांबद्दल अवमानजनक बोलणाऱ्यांना आणि लिखाण करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. बुधवारी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. छत्रपती उदयनराजे भोसले काय म्हणाले? मुळात आपण […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा अपमान करण्यांविरोधात देशद्रोह, राष्ट्रदोहाच्या कलमांर्गत गुन्हा दाखल करावा. तसंच महापुरुषांबद्दल अवमानजनक बोलणाऱ्यांना आणि लिखाण करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. बुधवारी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

हे वाचलं का?

छत्रपती उदयनराजे भोसले काय म्हणाले?

मुळात आपण विचार करायला हवा की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देशाला लोकशाहीचा एक ढाचा घालून दिला. आजही जगात राजेशाही असलेले अनेक देश आहेत. त्यामुळे त्यांनीही जर या देशात राजेशाही अबाधित ठेवायचा विचार केला असता तर आजही ती अबाधित असती.

पण सर्वात आधी राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, त्यात सर्व धर्मियांचा समावेश केला. आज त्यालाच आपण मंत्रिमंडळ असं म्हणतो.

लोकांच्या ध्रुवीकरणाचं काम सुरू :

पण आज आपण काय पाहतो. अनेकदा मला विचारतात की सर्वधर्मसमभावाची व्याख्या आता बदलली आहे का? प्रत्येकजण आपल्या सोयीने याबाबत वागत आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या ध्रुवीकरणाचं काम सुरू आहे. तुमचा अजेंडा काहीही असूदे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अजेंडा अंमलात आणत नसाल तर त्यांचं नाव तरी का घेता?

छत्रपतींच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले :

यापूर्वी पाकिस्तान वेगळा झाला, बांग्लादेश वेगळा झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे प्रांत एकच होते. त्यानंतर देशाचे तीन तुकडे झाले, आजही असं चालतं राहिलं तर आता किती होतील माहित नाही. छत्रपतींच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला तर होणार काय?

एवढे कोडगे झालो आहोत का आपण?

आज जर शिवाजी महाराजांचीच अवहेलना, अपमान होत आहे. लिखाणातून, चित्रपटांमधून, कोण तोंडाला येईल ते वक्तव्य करत आहे. हे आज नाही, चालत आलेलं आहे. एवढे कोडगे झालो आहोत का आपण? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत, चिखलफेक होत असताना शांत का?

आज मला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचा आहे. आज महाराजांचं जेव्हा तुम्ही नावं घेता, त्यांना आदर्श मानता. कोणतीही चळवळ असू दे. सर्व चळवळींचं मूळ हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत. त्यांचाही अपमान होत आहे. मग तरीही शांत का?

अवमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचं कलम लावा :

त्यामुळे छत्रपतींच्या किंवा कोणत्याही महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर, लिखाण करणाऱ्यांवर देशद्रोहनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आज राज्यपाल बोलले आहेत, कोणीही बोलेल, हळू हळू फॅशन होऊन जाईल. आपण शांत बसणार आहोत का? असं चालतं राहिलं तर पुढच्या पिढींना काय सांगणार आहोत.

प्रत्येक पक्षानं आणि नेत्यानं याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी :

परवा दिवशी मला गहिवरुन आलं. मी काही हतबल झालेलो, आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं हे आम्हाला माहित आहे. पण लोकांनीही विचार करायला हवा. प्रत्येक पक्षानं आणि नेत्यानं याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी. माध्यमांनी यांना भूमिका विचारायला हव्यात.

    follow whatsapp