खासदार उदयनराजेंविरोधात अपशब्द वापरणाऱ्या उद्योजकाला बेदम मारहाण, ७ जणं अटकेत

मुंबई तक

• 02:35 AM • 25 Jun 2021

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेंविरोधात अपशब्द काढणाऱ्या उद्योजकाला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इंदापूर येथील उद्योजक अशोक जिंदल यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. छत्रपती उदयनराजे म्हणजे गुंड असल्याची टीका अशोक जिंदल यांनी केली होती. यानंतर संतप्त झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काल […]

Mumbaitak
follow google news

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेंविरोधात अपशब्द काढणाऱ्या उद्योजकाला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इंदापूर येथील उद्योजक अशोक जिंदल यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

छत्रपती उदयनराजे म्हणजे गुंड असल्याची टीका अशोक जिंदल यांनी केली होती. यानंतर संतप्त झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी जिंदल यांना इंदापूरमध्ये गाठत त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी जिंदल यांना त्यांच्या गाडीबाहेर खेचून कपडे फाडत त्यांच्या तोंडाला काळंही फासण्यात आलं.

जिंदल यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या प्रकारानंतर जिंदल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी शिवधर्म फाऊंडेशनच्या दिपक काटे, अमोल पवार, कुणाल चव्हाण, प्रदीप भोसले, किरण साळुंखे, अक्षय चव्हाण, सुनील वायकर यांना अटक केली आहे.

    follow whatsapp