Omicron चा नायनाट करणार कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस, भारत बायोटेकचा दावा

मुंबई तक

• 01:47 PM • 12 Jan 2022

ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटने जगभरातल्या अनेक देशात दहशत माजवली आहे. कोरोनाचे रूग्णही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिन ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने हा दावा केला आहे. लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ? काय म्हटलं आहे भारत बायोटेकने? कोव्हॅक्सिन ही […]

Mumbaitak
follow google news

ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटने जगभरातल्या अनेक देशात दहशत माजवली आहे. कोरोनाचे रूग्णही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिन ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने हा दावा केला आहे.

हे वाचलं का?

लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

काय म्हटलं आहे भारत बायोटेकने?

कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावशाली ठरते आहे. कोव्हॅक्सिन या लसीचा बुस्टर डोस ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटना हरवणारा ठरणार असा दावा भारत बायोटेकने केला आहे. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस हा डेल्टा व्हेरिएंटवर 100 टक्के प्रभावी आहे तर ओमिक्रॉनवर 90 टक्के प्रभावी आहे. असा दावा भारत बायोटेकने केला आहे. त्यांच्या डेटामध्ये हा दावा करण्यात आला आहे.

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तर ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटचे रूग्णही वाढत आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. अशात ओमिक्रॉनवर कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी ठरणार ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.

भारत बायोटेकने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये एमोरी या विद्यापीठात केलेल्या निरीक्षणांचे, अभ्यासाचे निकाल जाहीर केले. ज्या ज्या लोकांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले आणि त्यानंतर या लसीचा बूस्टर डोस घेतला त्यांना ओमिक्रॉन किंवा डेल्टा व्हेरिएंटवर मात केली. या दोन्ही प्रकारांवर हा बूस्टर डोस प्रभावशाली ठरतो आहे.

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्णा एला म्हणाले: “आम्ही कोवॅक्सिनमधे सतत नावीन्यपूर्ण विकास घडवण्याच्या प्रक्रियेत आहोत. ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांविरूद्ध सकारात्मक तटस्थीकरण प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. या लसीचा बूस्टर डोस रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. कोविड-19 विरुद्ध जागतिक लस विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट प्रौढ आणि मुलांसाठी कोवॅक्सिनचा सार्वत्रिक लस म्हणून वापर करून साध्य झाले आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp