तिसरी लाट येणारच, निर्बंध शिथील करु नका! IMA चं केंद्र आणि राज्य सरकारला पत्र

मुंबई तक

• 02:16 AM • 13 Jul 2021

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती आता नियंत्रणात आलेली असली तरीही भविष्यकाळात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. परंतू सरकारने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक पर्यटनस्थळांवर गर्दी पहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी होत असली तरीही निर्बंध शिथील करुन आपण तिसऱ्या लाटेला आमंत्रणच देत असल्याचा इशारा IMA (Indian Medical Association) ने दिला आहे. […]

Mumbaitak
follow google news

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती आता नियंत्रणात आलेली असली तरीही भविष्यकाळात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. परंतू सरकारने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक पर्यटनस्थळांवर गर्दी पहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी होत असली तरीही निर्बंध शिथील करुन आपण तिसऱ्या लाटेला आमंत्रणच देत असल्याचा इशारा IMA (Indian Medical Association) ने दिला आहे.

हे वाचलं का?

पुढील तीन महिन्यांसाठी निर्बंध कडक करुन, Covid-appropriate behavior म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, हात वारंवार सॅनिटाईझ करणे या नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत IMA ने व्यक्त केलंय. IMA ने यासंदर्भात केंद्र व सर्व राज्य सरकारना पत्र लिहून निर्बंध शिथील न करण्याची मागणी केली आहे.

देश सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमधून जात आहे. आपण इतिहास तपासला तर प्रत्येक महामारीची तिसरी लाट ही येतेच. त्यामुळे लसीकरणावर जास्तीत जास्त भर देऊन लोकांना कोरोनाविषयक नियमांचं पालन करणं बंधनकारक करुन ही तिसरी लाट आपल्याला रोखता येईल असं IMA ने आपल्या पत्रात म्हटलंय. सध्याच्या खडतर काळातही अनेक राज्यांमध्ये स्वतः सरकारी यंत्रणा आणि लोकं गर्दी करणारे कार्यक्रम आयोजित करत असल्याबद्दल IMA ने चिंता व्यक्त केली आहे.

लवकरच WHO च्या यादीमध्ये Covaxin चा समावेश होणार, Bharat Biotech कडून महत्त्वाचं ट्विट

पर्यटन, धार्मिक स्थळं खुली करुन जर आपण लस न घेतलेल्या लोकांना घराबाहेर पडण्याची संधी दिली तर तर हीच लोकं तिसऱ्या लाटेसाठीचे आमंत्रक ठरु शकतात. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत ३७ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे IMA ने लिहीलेल्या पत्रावर केंद्र सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp