महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये आढळलं डबल म्युटेशन – राजेश टोपे

मुंबई तक

• 02:39 AM • 17 Apr 2021

मुंबई तक: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय. याला कारण कोरोनाचा बदललेल्या स्ट्रेन आहे का याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने केलेल्या एका सादरीकरणानुसार महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये डबल म्युटेशन आढळलं आहे. राज्यातील 60 टक्के सॅम्पल्समध्ये डबल म्युटेशन आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तक: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय. याला कारण कोरोनाचा बदललेल्या स्ट्रेन आहे का याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने केलेल्या एका सादरीकरणानुसार महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये डबल म्युटेशन आढळलं आहे.

हे वाचलं का?

राज्यातील 60 टक्के सॅम्पल्समध्ये डबल म्युटेशन आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नॅशनल कोव्हिड टास्कच्या फोर्सच्या एका मिटिंगमध्ये नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने (एनआयव्ही) एक प्रेझेंटेशन केलं होतं.

पण याबाबत नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (एनसीडीसी) ने याबाबत एनआयव्हीला याबाबत औपचारीकपणे माहिती दिलेली नाही. रुग्णांना उपचार देताना प्रोटोकॉलमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे किंवा याचा लसीच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होईल का त्याविषयी एनसीडीसीने माहिती द्यावी अशी राज्य सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्रात संकलित केलेल्या नमुन्यांमध्ये नवीन म्युटेशन आढळलं आहे. ज्यात B.1.617 हा म्युटंट आढळलं आहे. असे असले तरी राज्य सरकारला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

    follow whatsapp