मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेवर परिणाम, तीन दिवसांसाठी २० गाड्या रद्द

मुंबई तक

• 08:36 AM • 03 Feb 2022

मध्य रेल्वेच्या ठाणे जंक्शन विभागातील दिवा येथील पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे तब्बल ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत असल्याने त्याचा परिणाम मुंबईतून बाहेर जाणाऱ्या अनेक गाड्यांवर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांवरदेखील याचा परिणाम होणार आहे. कोकण […]

Mumbaitak
follow google news

मध्य रेल्वेच्या ठाणे जंक्शन विभागातील दिवा येथील पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे तब्बल ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत असल्याने त्याचा परिणाम मुंबईतून बाहेर जाणाऱ्या अनेक गाड्यांवर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांवरदेखील याचा परिणाम होणार आहे.

हे वाचलं का?

कोकण रेल्वे मार्गावरील एकूण २० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३ गाड्या या आपवल्या नियमीत वेळेत धावणार असून ६ गाड्या अंतिम थांब्यावर पोहोचू शकणार नाहीयेत.

कोकण रेल्वे मार्गावरील रद्द झालेल्या २० गाड्या –

५ फेब्रुवारी आणि रविवार ६ फेब्रुवारी रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . २२११ ९ ) मुंबई सीएमएसटी करमळी एक्सप्रेस,  ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . २२१२० ) मुंबई सीएमएसटी  – करमळी एक्सप्रेस , दि . ५ फेब्रुवारी , ६ आणि ७ रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . १२०५१ आणि १२०५२ ) मुंबई सीएमएसटी मडगाव जं . एक्सप्रेस, ७ रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . ११०८५ ) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जं, ८ रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . ११०८६ ) मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ५ रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . ११० ९९ ) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जं . ६ रोजी सुटणारी ट्रेन ( क्र . १११०० ) मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस , ५ रोजी सुटणारी ट्रेन ( क्र २२११३ ) लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली, ७ रोजीची ट्रेन ( क्र . २२११४ ) कोचुवेली -लोकमान्य टिळक . ६ फेब्रुवारीची ट्रेन ( क्र . १२२२४ ) एर्नाकुलम जं . – लोकमान्य टिळक टर्मिनस , ५ आणि ८ फेब्रुवारीची ट्रेन ( क्र . १२२२३ ) लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम जं . , ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन ( क्र . १२१३३ ) मुंबई सीएसएमटी मंगळुरु जं . आणि ट्रेन ( क्र . १२१३४ ) मंगळुरु जं . – मुंबई , ७ आणि ८ फेब्रुवारीची ट्रेन ( क्र . ११००३ ) दादर सावंतवाडी आणि ट्रेन ( क्र . ११००४ ) सावंतवाडी रोड – दादर . ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन ( क्र . ५०१०३ ) दिवा – रत्नागिरी पॅसेंजर आणि ट्रेन ( क्र . ५०१०४ ) रत्नागिरी – दिवा पॅसेंजर , ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन ( क्र . १०१०६ ) सावंतवाडी रोड- दिवा आणि ट्रेन ( क्र . १०१०५ ) दिवा सावंतवाडी रोड.

या गाड्या नियोजित थांब्यांवर पोहोचणार नाहीत –

३ ते ६ दरम्यान धावणारी ट्रेन ( क्र . ११००४ ) सावंतवाडी रोड- दादर ही गाडी,  ४ ते ७ दरम्यान धावणारी ट्रेन ( क्र . १०१०४ ) मडगाव- मुंबई सीएमएसटी गाडी, ४ ते ६ दरम्यान धावणारी ट्रेन ( क्र . १०११२ ) मडगाव- मुंबई सीएमएसटी गाडी, ६ फेब्रुवारी रोजी धावणारी ट्रेन ( क्र . १२२०२ ) कोचुवेली – लोकमान्य टिळक ( टी ) एक्सप्रेस,  ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान धावणारी ट्रेन (क्र . १६३४६ ) तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनन्स ट्रेन,  ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान धावणारी ट्रेन ( क्र . १२६२० ) मंगळुरु सेंट्रल लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्सप्रेस, या सर्व गाड्यांचा प्रवास पनवेल येथे समाप्त होईल.

    follow whatsapp