बारामती : चिंकारा हरणासह सहा सशांची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

मुंबई तक

• 12:54 PM • 01 Dec 2021

बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात एका चिंकारा जातीच्या हरणासह सहा सशांची शिकार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातल्या तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी वैभव सुभाष घाडगे (वय २६), संग्राम सुनील माने (वय २७) राहणार दोघेही सातारा रोड तर सुनिल मारुती शिंदे (वय ४०), दादा […]

Mumbaitak
follow google news

बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात एका चिंकारा जातीच्या हरणासह सहा सशांची शिकार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातल्या तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

याप्रकरणी वैभव सुभाष घाडगे (वय २६), संग्राम सुनील माने (वय २७) राहणार दोघेही सातारा रोड तर सुनिल मारुती शिंदे (वय ४०), दादा रामभाऊ पवार (वय ३७ रा. आबाजीनगर, पणदरे) अशी वनविभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या शिकार प्रकरणातील पाचवा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी याबाबत मुंबईतक शी बोलताना सांगितले की, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बारामती वनपरिक्षेत्रातील कर्मचारी सुभाष पानसांडे, नंदूकुमार गायकवाड, जयराम जगताप, सचिन काळे, प्रकाश लोंढे बारामती तालुक्यातील पणदरे परिक्षेत्रातील गट नंबर 435 मध्ये रात्रीची गस्त घालत असताना वनविभागात बॅट-यांच्या हालचाली जाणवल्या.

कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनास्थळी छापेमारी केली. त्यावेळी संबंधित पाच आरोपी एक चिंकारा जातीचे हरीण आणि पाच सशांची शिकार करताना रंगेहात आढळून आले. वनविभागाच्या अधिकारी चाहूल लागताच यातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र, इतर चौघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. पुण्याचे उपवनसंरक्षक मयुर बोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली. चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

    follow whatsapp