कल्याणमध्ये माजी भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर? ‘त्या’ होर्डिंगमुळे शहरात चर्चांना उधाण

मुंबई तक

• 11:50 AM • 03 Feb 2022

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरून एकीकडे भाजपने एकीकडे भाजपने शिवसेनेवर टीकेला सुरुवात केली आहे. परंतू दुसरीकडे कल्याणच्या सहजानंद चौकात भाजपच्या माजी नगरसेवकाने लावलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलं आहे. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी लावलं आहे. काही दिवसांपूर्वी ३ भाजप […]

Mumbaitak
follow google news

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरून एकीकडे भाजपने एकीकडे भाजपने शिवसेनेवर टीकेला सुरुवात केली आहे. परंतू दुसरीकडे कल्याणच्या सहजानंद चौकात भाजपच्या माजी नगरसेवकाने लावलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी लावलं आहे. काही दिवसांपूर्वी ३ भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेश व प्रभाग रचनेवरून भाजपची शिवसेनेवर होणारी टीका यामुळे हा बॅनर नेमके काय संकेत देतो येत्या काळात पाहावं लागणार आहे.

कडोंमपा निवडणूक: सावरकरांच्या नावाचा वॉर्ड वगळून सेनेचा विद्यमान आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न

एकीकडे आपल्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण आलेलं असताना दया गायकवाड यांनी पक्षांतराच्या चर्चांवर सावध प्रतिक्रीया दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे एक चांगलं व्यक्तीमत्व आहे, म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी हे पोस्टर लावल्याचं गायकवाड म्हणाले आहेत. दया गायकवाड हे खासदार कपिल पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

मी भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नाही, एका चांगल्या माणासाला शुभेच्छा देण्यासाठी पोस्टर लावलं असून त्याचं राजकारण करु नये असंही दया गायकवाड म्हणाले आहेत. एकीकडे प्रभाग रचनेवरुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडलेलं असताना, आमदार रविंद्र चव्हाण शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्यातच गायकवाड यांच्या पोस्टरमुळे आणखी एक भाजप नगरसेवक शिवसेनेची वाट धरणार का या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खासदार शिंदेंचं पोस्टर हे खरंच अभिनंदन करणारं होतं की त्यामागे काही वेगळा हेतू होता हे येणारा काळच ठरवणार आहे.

    follow whatsapp