उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री Kalyan Singh यांचं निधन

मुंबई तक

• 04:37 PM • 21 Aug 2021

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंग यांचं आज निधन झालं आहे. ४ जुलैपासून कल्याण सिंग यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान कल्याण सिंग यांची प्रकृती गंभीर झाली होती. multi-organ failure मुळे कल्याण सिंग यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंग यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सोशल मीडियावर […]

Mumbaitak
follow google news

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंग यांचं आज निधन झालं आहे. ४ जुलैपासून कल्याण सिंग यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान कल्याण सिंग यांची प्रकृती गंभीर झाली होती. multi-organ failure मुळे कल्याण सिंग यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

कल्याण सिंग यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कल्याण सिंग यांची तब्येत आणखीन खालावली होती. ज्यानंतर त्यांना dialysis वर ठेवण्यात आलं. परंतू यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकली नाही. उत्तर प्रदेशच्या राजकारणातले भाजपचे महत्वाचे नेते म्हणून ओळख असलेल्या कल्याण सिंग यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं. जुन १९९१ ते डिसेंबर १९९२ या काळात कल्याण सिंग यांनी पहिल्यांदा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषवलं. त्यांच्या पहिल्याच कारकिर्दीत उत्तर प्रदेशात बाबरी मशिद पाडण्यात आली होती.

यानंतर सप्टेंबर १९९७ ते नोव्हेंबर १९९९ या काळात कल्याण सिंग यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. कल्याण सिंग यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशचं मोठं नुकसान झाल्याची भावना दिग्गज नेत्यांनी बोलून दाखवली आहे.

    follow whatsapp