लंपी संक्रमित गाईचं दूध पिणं धोकादायक आहे का; काय म्हणतात तज्ज्ञ डॉक्टर?

मुंबई तक

• 08:55 AM • 25 Sep 2022

लंपी स्किन व्हायरसने देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड कहर माजवला आहे. या विषाणूमुळे देशभरात आतापर्यंत सुमारे ७० हजार पशुधन दगावले आहे. एकीकडे राजस्थानमध्ये गायींना पुरण्यासाठी जमीनच उरलेली नाही, तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात देखील हा रोग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. लंपी व्हायरसमुळे पशुपालकांमध्ये […]

Mumbaitak
follow google news

लंपी स्किन व्हायरसने देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड कहर माजवला आहे. या विषाणूमुळे देशभरात आतापर्यंत सुमारे ७० हजार पशुधन दगावले आहे. एकीकडे राजस्थानमध्ये गायींना पुरण्यासाठी जमीनच उरलेली नाही, तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात देखील हा रोग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. लंपी व्हायरसमुळे पशुपालकांमध्ये दहशत पसरली आहे. गायीच्या उपचारातचं खर्च होत आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या ग्रामीण भागात दूध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पन्नासाठी गायींवर अवलंबून असलेल्या लोकांवर उदरनिर्वाहाचे संकट आले आहे. सध्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच हा विषाणू आटोक्यात येईल, अशी आशा पशुवैद्यकांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

संसर्गग्रस्त गायीचे दूध पिण्यायोग्य आहे का?

लंपी विषाणूची लागण झालेल्या गायींच्या दुधात किती संसर्गजन्य आहे, हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. याबाबत तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले की, या विषाणूचा प्रभाव दुधात नक्कीच दिसून येतो परंतु ते पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकते. डॉक्टरांच्या मते लंपी विषाणूने ग्रस्त असलेल्या गायींचे दूध वापरण्यापूर्वी चांगले उकळले पाहिजे. असे केल्याने व्हायरस पूर्णपणे नष्ट होतो. त्यामध्ये मानवांसाठी कोणतेही हानिकारक घटक उरत नाहीत आणि कोणतेही नुकसान होत नाही.

गाईच्या वासरांना दूर ठेवावे

बाधित गायीचे दूध पिल्याने वासरू देखील या आजाराचा बळी ठरू शकतात. बहुतेक पशुवैद्यकांनी पशुधन मालकांना संक्रमित गायी आणि त्यांच्या वासरांना वेगळे ठेवण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्याने दोघांचे प्राण वाचू शकतात. आत्तापर्यंत, लंपी रोग असलेल्या प्राण्यांपासून मानवांमध्ये रोगाचा प्रसार झाल्याचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही. पण संक्रमित गायींचे दूध घेताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या या विषाणूवर शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे.

2019 मध्येही लंपीचा कहर पहायला मिळाला होता

2019 मध्येही भारतात लंपी व्हायरसचा कहर पहायला मिळाला होता. यावर्षी गुजरातमधून पुन्हा विषाणूचा प्रादुर्भाव झाला. आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये लंपी व्हायरस पसरला आहे. गुरांना विषाणूची लागण होत असल्याने त्याचा दूध उत्पादनावर लक्षणीय परिणाम होत आहे. कारण विषाणूची लागण झालेल्या गुरांची दूध देण्याची क्षमता कमी होते. गाई किंवा म्हशीमध्ये विषाणूची लक्षणे आढळल्यास तिचं अलगीकरण करावं, जेणेकरून संसर्ग इतर गुरांमध्ये पसरू नये.

    follow whatsapp