कन्नड संघटनांची मागणी कर्नाटक प्रशासनाकडून मान्य; महाराष्ट्रातील नेत्यांना ‘बेळगाव बंदी’

ऋत्विक भालेकर

• 03:12 PM • 05 Dec 2022

बेळगाव : सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेतील असं शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे यांनी याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्याचवेळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने चंद्रकांत […]

Mumbaitak
follow google news

बेळगाव : सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेतील असं शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे यांनी याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

हे वाचलं का?

त्याचवेळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि धैर्यशील माने या तिन्ही नेत्यांच्या प्रवेश बंदीचा आदेश काढला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 114 (3) अंतर्गत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील या तीन नेत्यांना प्रवेश बंदीचा आदेश बजावला आहे.

कर्नाटकमधील अनेक कन्नड समर्थक संघटनांनी ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या दौऱ्याला कडाडून विरोध दर्शविला होता. तसंच काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश पाटील म्हणाले, जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना आत प्रवेश दिल्यास जिल्ह्यासाठी अडचणीचे ठरेल. त्यामुळे त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय दंड संहिता कलम 143 नुसार प्रतिबंधात्मक कायदा जारी केला जाईल. या आदेशांचं उल्लंघन होऊन मंत्र्यांना अटक झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था आणखी बिघडू शकते. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. मुख्य सचिवांनी यापूर्वीच जिल्ह्यातील परिस्थिती स्पष्ट करणारं पत्र पाठवलं आहे. तसंच बेळगाव प्रशासन यावर पूर्णपणे लक्ष ठेवून असून सर्व सीमावर्ती भागात पुरेसं सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर्नाटक पोलिसांनीही दिला आहे मंत्र्यांना इशारा :

दरम्यान, यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांना आणि मराठी संघटनांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मंत्री विवाहासाठी, कोणाच्या घरी भोजनासाठी किंवा चर्चेसाठी बेळगावमध्ये येत असतील तर आम्ही काही करू शकत नाही; पण त्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला किंवा त्यांनी तसा प्रयत्न जरी केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिला आहे.

    follow whatsapp