कर्नाटक: हिजाबवरुन तुफान राडेबाजी, तीन दिवस शाळा-कॉलेज बंद

मुंबई तक

• 02:28 PM • 08 Feb 2022

Karnataka School College Closed: बंगळुरु: कर्नाटकात हिजाबबाबत सुरू असलेल्या वादामुळे आता थेट पुढील ३ दिवसांसाठी शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेला वाद पाहता पुढील 3 दिवस शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. […]

Mumbaitak
follow google news

Karnataka School College Closed: बंगळुरु: कर्नाटकात हिजाबबाबत सुरू असलेल्या वादामुळे आता थेट पुढील ३ दिवसांसाठी शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेला वाद पाहता पुढील 3 दिवस शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

हे वाचलं का?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, मी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा आणि महाविद्यालयांचे व्यवस्थापन तसेच कर्नाटकातील लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतो. मी पुढील तीन दिवस सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधितांकडून सहकार्याची विनंती.’

नेमका वाद काय?

कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिजाबवरून वाद सुरू आहे. उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केल्याने हा वाद सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती. परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता.

या वादानंतर इतर महाविद्यालयांमध्ये हिजाबबाबत गदारोळ सुरू असून, त्यामुळे अनेक ठिकाणी अभ्यासावर परिणाम होत असून, या प्रकरणाचं लोण आता संपूर्ण कर्नाटकमध्ये पसरत आहे. एकीकडे मुस्लिम मुली शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालून निषेध नोंदवत आहेत, तर दुसरीकडे अनेक विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून त्यांच्याविरोधात निषेध नोंदवत आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

अलीकडेच, कर्नाटक सरकारने राज्यात कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चे (Karnataka Education Act-1983) कलम 133 लागू केले आहे. त्यामुळे आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निश्चित गणवेश परिधान करणं अनिवार्य आहे. तसेच खासगी शाळांनाही स्वतःचा गणवेश निवडून विद्यार्थ्यांना तोच परिधान करणं अनिवार्य राहील.

हिजाब वादाचा नवीन व्हिडिओ आला समोर

त्याचवेळी, या विरोधादरम्यान आज एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भगवा स्कार्फ घातलेले काही लोक हिजाब घातलेल्या मुलीसमोर घोषणा देत आहेत. मुलं ‘जय श्री राम’ म्हणत आहेत, तर मुलगी ‘अल्लाहू अकबर’ म्हणत आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने या व्हिडिओला ‘लज्जास्पद’ म्हटले आहे. तर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनीही या घटनेचा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

संतापजनक! ‘ती’ हात जोडून विनवणी करत होती अन्…; अकोल्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हायकोर्टात पोहचला वाद

याप्रकरणी उच्च न्यायालयातही सुनावणी झाली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच उच्च न्यायालयात न्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्यासमोर याचिकाकर्त्याने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी दुसरी याचिका दाखल करण्यात आली असून, अशा स्थितीत जोपर्यंत सर्व कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत सुनावणी करता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

यावेळी कोर्टाने स्पष्ट केलं की, ते फक्त आणि फक्त कायद्याने चालतात. भावनेच्या आधारे नाही. यावेळी असंही विचारण्यात आलं की, हिजाब आवश्यक आहे असे कुराणात लिहिले आहे का? यावर याचिकाकर्त्याच्या वतीने लढणारे वकील कमथ यांनी सांगितले की, कुराणातील आयत 24.31 आणि 24.33 मध्ये ‘हेड स्कॉफ’बद्दल सांगितले आहे. तिथं ते किती महत्त्वाचं आहे हे देखील सांगितलं आहे.

    follow whatsapp