Maharashtra Corona Cases: महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब, पाहा दिवसभरात किती नवे रुग्ण सापडले

मुंबई तक

• 05:14 PM • 26 Jun 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (26 जून) दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents)9812 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनाची चिंता कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,20,881 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 9,812 नवे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (26 जून) दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents)9812 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनाची चिंता कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,20,881 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.

हे वाचलं का?

गेल्या 24 तासात राज्यात 9,812 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर आता पु्न्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र दिसत आहेत. राज्यात सध्या 1 लाख 21 हजार 251 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 8,752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,81,551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 179 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.0 टक्के एवढा आहे.

Maharashtra Lockdown: महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पाहा कुठे काय सुरु, काय बंद

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,08,31,332 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,26,847 (14.76 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,28,299 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,272 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,21,251 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 13 हजार 943

  • ठाणे (Thane) – 16 हजार 260

  • पुणे (Pune) – 17 हजार 360

  • नागपूर (Nagpur) – 3 हजार 922

  • नाशिक (Nashik)- 3 हजार 452

  • कोल्हापूर (Kolhapur) – 11 हजार 081

  • अहमदनगर (Ahmednagar) – 3 हजार 522

  • सातारा (Satara) – 7 हजार 702

  • सांगली (Sangli)- 9 हजार 500

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 1 हजार 351

PUNE Lockdown: पुणेकरांसाठी मोठी बातमी, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु; सोमवारपासून काय असणार कठोर निर्बंध?

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 17 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील सध्या 11 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

मुंबईत दिवसभरात सापडले 648 रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 648 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1919 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 92 हजार 787 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के आहे. डबलिंग रेट 723 दिवसांवर गेला आहे.

    follow whatsapp