Manoj Jarange : बेवड्या तू तुझी तब्बेत सांभाळ, छगन भुजबळांची जरांगेंवर जहरी टीका
Maharashtra Breaking News Live : सरकारच्या शिष्टमंडळाने शनिवारी रात्री रूग्णालयात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीत गिरीश महाजन यांनी 24 डिसेंबर ही दिलेली डेडलाईन वाढवून देण्याची मागणी केली. या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. छगन भुजबळ यांची आज भिवंडीत आरक्षण बचाव सभा होणार आहे. यासह महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी आणि यासोबतच राजकीय, सामाजिक आणि इतर सर्वच क्षेत्रातील तसेच देशासह तुमच्या शहरातील आणि गावातील प्रत्येक घटना पाहा मुंबई Tak वर. पाहा सर्व लाइव्ह अपडेट एकाच ठिकाणी.
ADVERTISEMENT

मुंबई तक
17 Dec 2023 (अपडेटेड: 18 Dec 2023, 12:39 PM)
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 10:17 PM • 17 Dec 2023Marathi News Live Update : प्रिया सिंहप्रकरणी तिघा आरोपींना अटक, एसआयटीकडून वेगाने तपासमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांचा मुलगा अश्वजित गायकवाडवर त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंगने आपल्याला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यामध्ये ती जखमीही आहे. त्याप्रकरणी आता तिघा आरोपींना एसआयटीकडून अटक करण्यात आली आहे.
- 09:41 PM • 17 Dec 2023Marathi News Live Update : बेवड्या तू तुझी तब्बेत सांभाळ, छगन भुजबळांची जरांगेंवर जहरी टीकामराठा विरुद्ध ओबीसी हा लढा तीव्र होताना आता दिसत असल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत दारूच्या वाक्प्रचारावरून त्यांनी त्यांच्यावर टीका केली. जरांगेंचा उल्लेख करत आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला अशा शब्दात त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. बेवड्या तू तुझी तब्बेत सांभाळ असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता आणखी हा वाद चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
- 09:14 PM • 17 Dec 2023Marathi News Live Update : जगात कट्टरता वाढल्याने समस्या वाढल्या, मोहन भागवत यांनी व्यक्त केली खंतजगात कट्टरता वाढल्याने समस्या वाढल्या आहेत. समस्यामुक्त जग निर्माण करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर टाकली असल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. देशासमोरील अनेक समस्या यशस्वीपणे सोडवल्या पाहिजेत. त्याची उदाहरणंही जगासमोर राहिली पाहिजेत असं जग निर्माण करण्याची जबाबदारी नियतीने आपल्या देशावर म्हणजे आपल्या देशातील लोकांवर टाकली असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेच्या शतकपूर्ती समारंभाच्या निमित्ताने ते सांगलीमध्ये बोलत होते.
- 03:19 PM • 17 Dec 2023Manoj Jarange : शिंदे समितीला मुदतवाढ द्या, पण..., जरांगेंनी सरकारला काय सांगितलं?अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "शिंदे समितीला मुदतवाढ दिली पाहिजे, हे आम्ही शिंदे सरकार विनंती करतो. पण, सरकारने असं समजू नये की, मुदतवाढ दिली म्हणजे आम्हाला वेळ वाढवून दिला का? नाही. 24 डिसेंबरपर्यंत कायदा बनवा. समितीला मुदतवाढ द्या. समितीचा आणि कायदा बनवण्याचा काहीही संबंध नाही. नोंदींच्या आधारावर कायदा बनवा आणि समितीला नोंदी शोधू द्या", असं जरांगे पाटील यांनी सरकारला सांगितलं.
- 10:55 AM • 17 Dec 2023Nagpur Breaking : सोलर कंपनीत भयावह स्फोट, 8-10 कामगार जागीच ठारNagpur latest accident news, Solar Industries India Limited : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे भीषण दुर्घटना घडली आहे. बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोजिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीत भयंकर स्फोट झाला. रविवारी (17 डिसेंबर) ही घटना घडली. यात 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही कंपनी देशाच्या रक्षण विभागाला स्फोटकं पुरवण्याचे काम करते. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- 09:21 AM • 17 Dec 2023Marathi News Live Update : ठाण्याच्या भिवंडीत आज ओबीसी मेळाव्याचं आयोजनठाण्याच्या भिवंडीत आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला केंद्रिय मंत्री कपिल पाटील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार आहेत. मंत्री छगन भुजबळसुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. दूपारी तीन वाजता या मेळाव्याला सुरूवात होणार आहे.
- 09:07 AM • 17 Dec 2023Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटलांच्या बैठकीला थोड्याच वेळात होणार सुरुवातमनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीची संपूर्ण तयारी झाली आहे. साधारण 9 वाजताच्या दरम्यान जरांगे पाटील बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
- 09:03 AM • 17 Dec 2023Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तूटल्याने ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे. कर्जत ते बदलापूर लोकल सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. सिंहगड एक्सप्रेस कर्जतजवळ थांबवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.
- 08:29 AM • 17 Dec 2023Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटलांनी बोलावली तातडीची बैठकमराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर ही मुदत जरांगे यांनी सरकारला दिली आहे. ती वाढविण्याची विनंती करण्यासाठी गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी येथे बैठक बोलवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
