हिंगोलीत पूर,दिल्ली दौऱ्यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन,म्हणाले…

मुंबई तक

• 08:49 AM • 09 Jul 2022

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. […]

Mumbaitak
follow google news

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

हे वाचलं का?

Eknath Shinde: ”मी महाविकास आघाडी सरकारमध्येच मुख्यमंत्री होणार होतो, पण…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले.

मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झालं आहे. या संपूर्ण पूरस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीहूनही लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोन करून याविषयीची चौकशी केली. पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीने सोडवा आणि योग्य त्या उपाय योजना करा असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Eknath Shinde : “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण..”

दिल्लीवरुन मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) जिल्हाधिकाऱ्यांना फोन

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले.

आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला

आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळं पिकांसह शेतीही खरडून गेली आहे. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

    follow whatsapp