मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पुढील वर्षभरासाठी गरजेचं – प्रकाश जावडेकर

मुंबई तक

• 10:12 AM • 23 Mar 2021

नवीन वर्षात भारतामध्ये कोरोनाचं लसीकरण सुरुवात झालं आहे. १ मार्चपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली होती. या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या लोकांना फक्त लस दिली जात होती. परंतू १ एप्रिलपासून आता ४५ पासून पुढील वयोगटातील लोकांनाही लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातली […]

Mumbaitak
follow google news

नवीन वर्षात भारतामध्ये कोरोनाचं लसीकरण सुरुवात झालं आहे. १ मार्चपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली होती. या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या लोकांना फक्त लस दिली जात होती. परंतू १ एप्रिलपासून आता ४५ पासून पुढील वयोगटातील लोकांनाही लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातली माहिती पत्रकार परिषदेत दिली. याचवेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढील एक ते दीड वर्ष मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं असल्याचंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

सध्याच्या घडीला देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस देण्यात येत आहेत. दरम्यान याचसंदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र सरकराने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहीलंय. या पत्राद्वारे कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्यात यावा अशी सूचना केली आहे.

मुंबईतल्या खासगी रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रांविषयी मोठा निर्णय

NTAGI आणि NEGVAC यांनी लसीकरणासंदर्भात अभ्यास केला. या अभ्यासानंतर केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्यात यावा असा निर्णय घेतलाय. केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे, कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा 4-8 आठवड्यांनी द्यावा. दरम्यान सध्या या लसीचा डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येतोय. मात्र कोव्हिशिल्ड लसीमधील दोन डोसमधील अंतर वाढवावं आणि ते 2 महिने असावं अशा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आणखी कोणी-कोणी घेतली लस?

केंद्र सरकारने लसीसाठी दिलेल्या सूचना या केवळ कोव्हिशिल्ड या लसीसाठी आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन या लसीचे डोस हे ठरलेल्या अंतराने देण्यात यावेत, असंही केंद्राने स्पष्ट केलंय. कोव्हिशिल्ड ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार केली जातेय. या लसीचा देशातील कोरोना लसीकरणासाठी केला जात असून ही कोरोना लस इतर देशांनाही पुरवण्यात येतेय.

    follow whatsapp