अकोल्यात विधवा सुनेचा पुनर्विवाह करुन सासूने घालून दिला आदर्श

मुंबई तक

• 08:55 AM • 27 Nov 2021

– धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी विधवा पुनर्विवाहाची चळवळ भारतात सुरु होऊन अनेक वर्ष लोटली, परंतू आजही समाजाच्या अनेक भागांत तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रियांबद्दल काही लोकं जुनाट विचार बाळगून असतात. परंतू अकोल्यात राहणाऱ्या लता बाहेकर यांनी या सर्व विचारांना मागे सारत आपल्या विधना सूनेचा पुनर्विवाह लावून दिला आहे. विशेष गोष्ट म्हणजे या घटनेत महेंद्र पेटकर […]

Mumbaitak
follow google news

– धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी

हे वाचलं का?

विधवा पुनर्विवाहाची चळवळ भारतात सुरु होऊन अनेक वर्ष लोटली, परंतू आजही समाजाच्या अनेक भागांत तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रियांबद्दल काही लोकं जुनाट विचार बाळगून असतात. परंतू अकोल्यात राहणाऱ्या लता बाहेकर यांनी या सर्व विचारांना मागे सारत आपल्या विधना सूनेचा पुनर्विवाह लावून दिला आहे.

विशेष गोष्ट म्हणजे या घटनेत महेंद्र पेटकर या युवकानेही विधवेसह तिच्या दोन्ही मुलांना स्विकात सर्वांना आदर्श घालून दिला आहे. अकोल्यातील एका बंगल्यात आज हा विवाह सोहळा पार पडला. तीन वर्षांपूर्वी लता बाहेकर यांचा मुलगा धनंजयचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ऐन तारुण्यात विधवा झालेल्या आपली सून स्वातीचा विचार करुन लताबाईंचं मन नेहमी दुःखी व्हायचं.

नेहमीप्रमाणे लताबाईंच्या या निर्णयाला काही लोकांनी विरोध केलाही. परंतू भावसार समाजातील काही प्रगत मंडळींनी लताबाईंच्या निर्णयाला पाठींबा देत त्यांना सुनेचा पुनर्विवाह करण्यासाठी मदत केली.

स्वातीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्र पेटकर या तरुणानेही तिच्या दोन्ही मुलांना आपलंस करण्याचं निर्णय घेऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. महेंद्र हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे खासगी नोकरी करतो. “मला जिवनात सर्वकाही न मागता मिळालं आहे. मी आतापर्यंत गजानन महाराजांच्या वाऱ्या केल्या त्याचं फळ मला मिळालं. त्यामुळे यापुढे या दोन मुलांची सर्व जबाबदारी आता मी घेतली आहे”, अशी प्रतिक्रीया महेंद्र यांनी दिली.

यादरम्यान स्वातीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. १० वर्षांपूर्वी माझ्या लग्नाचा निर्णय जेव्हा आईने घेतला त्यापेक्षा जास्त आनंद मला आता झाला आहे. सासूने घेतलेल्या निर्णयानंतर मला खूप प्रसन्न वाटलं आहे. आमच्या आईसारखं सगळ्यांनी वागलं आणि सासु-सुनेत कोणताही फरक मानला नाही तर दुर्दैवी प्रसंग कधीच होणार नाही अशा भावना स्वातीने बोलून दाखवल्या.

अलिकडच्या काळात प्रत्येकजण आपल्या सोईचा आदर्शवाद जपतोय. मात्र, लताबाईंनी घालून दिलेला आदर्श हा समाजासाठी आदर्श पायंडा पाडणारा आहेय. सोबतच सासू-सुनेच्या पारंपारिक नात्याला सकारात्मकतेच्या नव्या उंचीवर नेणारा आहे.

    follow whatsapp