Mumbai Mayor किशोरी पेडणेकर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज, आता प्रकृती उत्तम

मुंबई तक

• 12:24 PM • 20 Jul 2021

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 20 जुलै म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ग्लोबल रूग्णालयातून घरी परतल्या आहेत. काय म्हणाल्या मुंबईच्या महापौर? ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 20 जुलै म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ग्लोबल रूग्णालयातून घरी परतल्या आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाल्या मुंबईच्या महापौर?

ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत.

त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग तज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख श्री.अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसुझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना 18 जुलै रोजी ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतल्या ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोटदुखीचाही त्रास होतो आहे असंही रूग्णालयाने सांगितलं होतं. त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू करण्यात आले होते. आता महापौरांची प्रकृती बरी असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना ज्यादिवशी रूग्णालयात दाखल केलं होतं तेव्हा त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज मिळेल याबाबतची माहिती देण्यात आलेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत, किशोरी पेडणेकर यांना लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना बरं वाटू लागल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    follow whatsapp