नागपूर: आधी संघाच्या छोटू भोयरांना तिकीट नंतर अपक्षाला मतदानाचे आदेश, काँग्रेसचा पुरता सावळागोंधळ

मुंबई तक

• 04:32 PM • 09 Dec 2021

(योगेश पांडे, नागपूर) Legislative Council Election: नागपूर: नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या ऐन आदल्या दिवशी काँग्रेसवर (Congress) आपला उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. छोटू भोयरऐवजी (Chotu Bhoyar) अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली. या निवडणुकीत अनेक कंगोरे आहेत. विजयासाठी आम्ही उमेदवारी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

(योगेश पांडे, नागपूर) Legislative Council Election: नागपूर: नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या ऐन आदल्या दिवशी काँग्रेसवर (Congress) आपला उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. छोटू भोयरऐवजी (Chotu Bhoyar) अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली. या निवडणुकीत अनेक कंगोरे आहेत. विजयासाठी आम्ही उमेदवारी बदलला असं स्पष्टीकरण यावेळी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे.

हे वाचलं का?

दुसरीकडे ज्यांची उमेदवारी बदलण्यात आली ते छोटू भोयर यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं सांगितलं. पक्षाला मला बदलवून विजय मिळू शकतो, असं वाटत असल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवाराला उमेदवारी दिली. असं सांगत कॉंग्रेसला मदत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही ही खेळी खेळल्याचं काँग्रेसने सांगितलं. मात्र, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन तरी कॉंग्रेस जिंकणार आहे का? हा मुळात प्रश्न आहे. कारण भाजपकडे काँग्रेसपेक्षा 60 मतदान अधिक आहे. त्यामुळं कॉंग्रेस काय चमत्कार करणार आणि कशी निवडणूक जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

‘भोयर यांनी निवडणूक लढविण्यासाठी असमर्थता दर्शविली’, पाहा काँग्रेसने पत्रकात काय म्हटलंय

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी मतदान होत आहे.

मात्र आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते, त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच मा. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.

तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यासंदर्भात माहिती देण्यात यावी.

संघ स्वयंसेवक ते काँग्रेस उमेदवार

डॉ. भोयर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे नागपुरातील रेशीमबाग स्थित असलेल्या स्मृतिमंदिर परिसरातूनच डॉ. छोटू भोयर हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवाशाने भाजप आणि संघ परिवारासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

छोटू भोयर हे बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक सुद्धा राहिलेले आहेत तसेच यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा संघ परिवारासोबत जुळलेले आहेत. डॉ भोयर यांच्या उमेदवारीने गेल्या अनेक दिवसंपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला असून, भोयर यांना काँग्रेस पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आपला अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.

डॉ रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. भोयर यांनी सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी भोयर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बंददाराआड चर्चा झाली होती.

वर्ध्यातील सेवाग्राममध्ये काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोमवारी (22 नोव्हेंबर) काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपमधून आयात केलेल्या छोटू भोयर यांना तिकीट दिलं आहे.

Nagpur MLC Election : बावनकुळेंविरोधात काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

कोण आहेत भोयर?

डॉ रवींद्र उर्फ छोटू भोयर हे भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात आणि ते नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक सुद्धा आहेत. नागपुरातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांचे छोटू भोयर हे भाचे आहेत. ते नागपूरचे माजी उपमहापौर सुद्धा होते. गेल्या अनेक दिवसांपासून भोयर हे भाजप नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp